Thursday, June 13, 2024

‘कलावंत व्यक्त झाले तरी बोंब आणि…’, संभाजी भिंडेंच्या वक्तव्यानंतर वैभव मांगले कडाडले

‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे प्रमुख संभाजी भिडे हे त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. त्याचे वक्तव्यामुळे अडचणीत येतत असतात. ते राजकीय नेते मंडळी असो वा इतर कोणी असो त्यांच्यावर खोचक शब्दात टिका करत असतात. भिडे गुरुजी यांनी नुकतेच महात्मा गांधी विषयी मोठे वक्तव्य केले आहे. जे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्या वक्तव्यावरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यावरून प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी देखील एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

वैभव मांगले (Vaibhav Mangle) सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करताना लिहिले की, “कलावंत व्यक्त होत नाही म्हणून बोम्ब व्यक्त झाले तरी बोम्ब….ज्यांच्या लाभाचे ते कौतूक करणार, नाही ते बदनामी करणार. काय करायचं?” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावरून चर्चा रंगली आहे. त्यांची हि पोस्ट पाहून युजरने त्यांनी ट्रोल करत आहे.

यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “काय आहे ना वैभवजी गांधींना बोलल्यावर तुम्हाला मिरच्या लागल्या तेच सावरकरांबद्दल तो राहुल गांधी बोलल्यावर कुठे होतात तुम्ही.” दुसऱ्याने लिहिले की, “चिंधी लोकांकडे लक्ष देणे टाळा. आपणही या देशाचे नागरिक आहात…. काही लोकांना ते समजत नाही हे वेगळे आहे.” तर तिसऱ्या एकाने “कलावंत काय वेगळी कॅटेगिरीचे असते काय? माणुसच ना ?” असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, भिडे गुरुजी म्हणीले होते की, “महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नाहीत. एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक वक्‍तव्‍य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. यामुळे सगळ्याच स्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहेत. (Vaibhav Mangale reacted after the statement of Manohar alias Sambhaji Bhide, head of Shiv Pratishthan Hindustan Sanstha)

अधिक वाचा- 
अर्रर्र, हे काय झालं! अभिनेत्री क्रिती सेननच्या चेहऱ्यावर दिसली सूज, व्हिडिओ जोरदार व्हायरल
नशिबाची थट्टा! फरदीन खान वयाच्या 49व्या वर्षी घेणार घटस्फोट; मोडणार 18 वर्षांचा संसार?

हे देखील वाचा