Tuesday, July 9, 2024

‘जेव्हा माझा क्रश माझ्याकडे बघतो…’, म्हणत मराठमोळ्या वैदेहीने सुंदर व्हिडिओ केला शेअर

आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच वैदेही परशुरामी. अभिनयाशिवाय ही अभिनेत्री नृत्य कलेतही पारंगत आहे. तिने तिच्या प्रतिभेच्या जोरावर बरेच नाव कमावले आहे. वैदेही सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, नेहमीच ती चाहत्यांचे लक्ष वेधते. आता पुन्हा वैदेहीच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्या चाहत्यांसाठी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, वैदेहीचे अप्रतिम एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. तिच्या व्हिडिओतील अदा चाहत्यांना नव्याने तिच्या प्रेमात पाडत आहेत.

यात तिने ‘पिया तोसे नैना लागे रे’ या गाण्यावर अभिनय केलेला पाहायला मिळत आहे. सहज सुंदर रूप आणि वेड लावणाऱ्या अदा पाहून कोणीही तिच्यावर फिदा होईल. हा व्हिडिओ शेअर करत वैदेहीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा माझा क्रश माझ्याकडे बघतो, तेव्हा मी.” यावर आता नेटकऱ्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने लिहिले की, “खूप सुंदर.” तर दुसरा म्हणतोय की, “विना मेकअप सुद्धा सुंदर दिसतेस.” एका इतर चाहत्याने वैदेहीचे कौतुक करत लिहिले की, “सुंदरतेचं उदाहरण म्हणजे तू.”

वैदेहीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. अमिताभ बच्चन अभिनित ‘वझीर’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. याशिवाय ‘सिम्बा’मध्ये तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटातही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा