Wednesday, July 2, 2025
Home अन्य वर्षा प्रियदर्शनीने पतीकडे मागितली ‘इतकी’ पोटगी, जवळ न येऊ दिल्यामुळे होतोय घटस्फोट

वर्षा प्रियदर्शनीने पतीकडे मागितली ‘इतकी’ पोटगी, जवळ न येऊ दिल्यामुळे होतोय घटस्फोट

ओडिया फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी (Varsha Priyadarshini) गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे झाल्यापासून, वर्षा आणि तिचे पती बीजेडी खासदार अनुभव मोहंती सोशल मीडियावर सतत चर्चेत आहेत. दरम्यान, आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर, घटस्फोटाच्या बदल्यात अभिनेत्रीने पतीकडून मोठ्या रकमेची मागणी केली आहे.

शारीरिक संबंध न ठेवल्याच्या पतीच्या आरोपानंतर, वर्षाने आपल्या खासदार पतीवर घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत अफेअरचे आरोप केले आहेत. इतकेच नाही, तर या संपूर्ण प्रकरणात वर्षाने पतीकडे १५ कोटी रुपयांची मागणीही केली आहे. रिपोर्टनुसार वर्षा म्हणाली की, तिचा पती अनुभव याचे विवाहबाह्य संबंध आहेत. मात्र, कोण बरोबर आणि कोण चूक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (varsha priyadarshini demanded 15 crores from her husband anubhav mahanty)

विशेष म्हणजे, बीजेडी नेते अनुभव मोहंती यांनी त्यांची पत्नी वर्षा प्रियदर्शनी हिने लग्नाच्या आठ वर्षानंतरही जवळ येऊ दिले नसल्याचा आरोप केला आहे. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले. पण लग्नानंतर त्यांनी याविरोधात आवाज उठवला तो लग्नाच्या दोन वर्षानंतर, म्हणजे २०१६ मध्ये. जेव्हा अभिनेत्रीने त्यांना शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी दिली नाही. अनेक प्रयत्नांनंतर, प्रत्येक वेळी निराश होऊन, अखेर २०२० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे खासदार सांगतात.

ओडिया अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनीने बंगाली चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बंगाली चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने २००३ पासून ओडिया चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी, तिचे पती आणि नेते अनुभव मोहंती हे देखील पहिले अभिनेते आणि चित्रपट निर्माता होते, परंतु नंतर त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा