मोठी बातमी! पार्टीवरुन परतताना नवरदेव वरुण धवनच्या गाडीचा अपघात


आज वरुण धवन आपल्या मित्रांसोबत अलिबागला जात असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये वरुण धवनला काहीही दुखापत झाली नसून, त्याचे मित्र देखील सुखरुप आहेत.

अभिनेता वरुण धवनच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. त्याचे लग्न आज नताशा दलाल सोबत अलिबागमध्ये होणार आहे.

वरुणने आज आपल्या मित्रांसाठी जुहूमध्ये बॅचलर पार्टी ठेवली होती. ही पार्टी झाल्यानंतर तो मित्रांसोबत जुहूवरुन अलिबागसाठी निघाला. 4 तासांच्या या प्रवासामध्ये त्यांना बरंच ट्रॅफिक आणि जागे-जागेवर खड्ड्यांना सामोरे जावे लागले.

वरुण धवनला लवकरात लवकर अलिबागला पोहोचायचे होते. त्यामुळे घाईत असताना हा अपघात झाला. परंतु आता वरुण अलिबागला सुखरुप पोहोचला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.