आपल्या कोकणातील ‘या’ गावात उडणार नताशा-वरुणच्या लग्नाचा बार


बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्या लग्नाच्या चर्चा संपूर्ण बॉलीवूड अनेक वर्ष ऐकत आले आहे. आता अनेक वर्षांनी तो दिवस अखेर येऊन ठेपला आहे. या दोघांचे लग्न सुरवातीला एप्रिल २०२० साली ठरवण्यात आले होते, मात्र कोविड-१९ मुळे ते पुढे ढकलण्यात आले.

आता अनेक फोटोज आणि सूत्रांच्या माहितीनुसार अलीबागच्या एका आलीशान बंगल्यामद्धे या दोघांचे लग्न पार पडणार आहे असे समजते आहे. रविवारी म्हणजे २४ जानेवारी रोजी हे लग्न पार पडणार आहे. दोन कुटुंबांनी तीन दिवसांच्या उत्सवासाठी संपूर्ण रिसॉर्ट बुक केला आहे. शिवाय दोन्ही कुटुंबानी या लग्नाबद्दल गुप्तता पाळली आहे.

शुक्रवारी, या जोडप्याने जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मेहंदी सोहळा केला. शुक्रवारी संध्याकाळी लोकप्रिय मेहंदी कलाकार वीणा नागदा कार्यक्रमस्थळी दिसली होती. आज म्हणजेच शनिवारी संगीत सोहळा होईल आणि त्यानंतर रविवारी विवाह सोहळा होईल.

या जोडप्याच्या लोकप्रियतेमुळे आणि कार्यक्रमाच्या बाहेर असणाऱ्या पापाराझीच्या उपस्थितीमुळे नताशा आणि वरुण धवनच्या या मोठ्या दिवसासाठी सुरक्षेची व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली आहे.

कार्यक्रमस्थळाभोवती कडक सुरक्षा कवच ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी अनेक सुरक्षारक्षक देखील तयनात केले आहेत. गोष्टी सुरळीत व्हाव्यात यासाठी जागेवर अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. कोणताही बाह्यव्यक्ति त्या ठिकाणी डोकावू शकत नाही किंवा तेथे प्रवेश करू नये यासाठी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.