Friday, May 24, 2024

वरुण धवन जान्हवीसोबत करतोय करिअरमधील सर्वात महागडा चित्रपट, एका दिवसात खर्च होतायत ‘इतके’ कोटी

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या त्यांच्या आगामी ‘बवाल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघेही अनेकदा त्यांच्या इंस्टाग्रामवर शूटिंग लोकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात. आता बातमी समोर आली आहे की, ‘बवाल’ हा वरुण धवनच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या एक दिवसाचे बजेट ऐकून चाहत्यांची डोळे पांढरे होतील. 

नितेश तिवारी ‘बवाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्याचबरोबर चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या बॅनरखाली नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होत आहे. हा एक प्रेमकथा असलेला चित्रपट असेल, ज्यामध्ये जान्हवी आणि वरुणची जोडी दिसणार आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एप्रिलमध्ये चित्रपटाची सुरुवात झाली. वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. (varun dhawan new movie bawaal is most expensive film)

रिपोर्ट्सनुसार, ‘बवाल’ पुढील वर्षी ७ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. वृत्तानुसार, या चित्रपटाचे वर्णन वरुण धवनच्या करिअरमधील सर्वात महागडा चित्रपट म्हणून करण्यात आले आहे. चित्रपटाचे एका दिवसाचे बजेट २ कोटींहून अधिक जात आहे. चित्रपटातील ऍक्शन सीक्वेन्सपासून रोमँटिक लोकेशन्सपर्यंत दुप्पट पैसे खर्च केले जात आहेत.

ऍक्शन सीनच्या शूटिंगसाठी ४५ हून अधिक हेजहॉग्स तसेच असंख्य बनावट बॉम्ब, चाकू आणि विविध प्रकारची स्फोटकं आहेत, जी चित्रीकरणासाठी वापरली जात आहेत. या चित्रपटाच्या दैनंदिन शूटिंगवर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जात आहेत. हे १० दिवसांचे वेळापत्रक आहे. वरुणचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा