बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्याच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलीच पसंती मिळाली होती. यासोबतच चित्रपटातील गाण्यांनाही चांगलीच पसंती मिळत आहे. वरुणचा हा चित्रपट या महिन्यात २४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्याची चाहत्यांना खूप प्रतीक्षा आहे. हा चित्रपट करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनवला आहे. दरम्यान, वरुणच्या एका वक्तव्याची खूप चर्चा होत आहे.ज्यामध्ये वरुणने प्रेक्षकांना कशाप्रकारे चित्रपट पाहण्यास आवडतात याबद्दल खुलासा केला आहे.
अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या जुगजुग जियो या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसणार आहे. नुकतेच त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने साऊथ सिनेमाबद्दल एक वक्तव्य केले आहे. बॉलीवूड विरुद्ध साऊथ चित्रपट असा बराच काळ वाद सुरू आहे आणि त्यामागचे कारण म्हणजे या वर्षात हिंदी चित्रपटांसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे आणि नुकतेच प्रदर्शित झालेले साऊथ चित्रपट करत आहेत. त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये प्रदर्शित झालेले बहुतांश चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. अशा प्रसंगी सर्व स्टार्स आपापले मत मांडत आहेत. वरुण धवननेही बऱ्याच दिवसांनी या विषयावर आपले मत मांडले आहे.
https://www.instagram.com/reel/Ce57-kmgP4N/?utm_source=ig_web_copy_link
याबाबत बोलताना वरुण धवन म्हणाला की, “साऊथ इंडस्ट्रीतही ७-८ चित्रपट फ्लॉप झाले आहेत. हे असे होत आहे कारण गेल्या 2 वर्षात फक्त काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मला वाटतं येत्या काळात अनेक चांगले चित्रपट येतील. अजून बरेच चांगले चित्रपट यायचे आहेत. प्रत्येक चित्रपट हिट होऊ शकत नाही. प्रेक्षक वाईट चित्रपट पाहणार नाहीत, मग तो इंग्रजी असो, हिंदी असो की दक्षिणेचा कोणताही चित्रपट. चित्रपटाची कथा चांगली नसेल तर लोक बघत नाहीत,”
याबद्दल पुढे बोलताना तो म्हणाला की, “आता फक्त हॉलीवूडचेच चित्रपट बघा, या प्रेक्षकांना तिथले चित्रपट पाहायला आवडतात आणि म्हणूनच ते पाहत आहेत. KGF 2 हा चित्रपट पाहून मला खूप आनंद झाला. सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक आहे,”वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘जुग जुग जिओ’ चित्रपटानंतर तो ‘बावल’ आणि ‘भेलिया’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्याच वेळी, वरुण शेवटचा 2020 साली रिलीज झालेल्या ‘कुली नंबर 1’ या चित्रपटात सारा अली खानसोबत दिसला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा