Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! वरुणने ढसाढसा रडत व्यक्त केलं दु: ख; अभिनेता करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना

धक्कादायक! वरुणने ढसाढसा रडत व्यक्त केलं दु: ख; अभिनेता करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या ‘भेडिया’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. वरुण धवनचा भेडिया चित्रपट प्रदर्शित मार्गावर आहे. भेडिया चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वरुणने खुलासा केला की, मागील चित्रपट ‘जुग्जुग जिओ’साठी कठोर परिश्रम केल्यानंतर त्याला एका आजाराचा सामना करावा लागला होता. या आजाराचे नाव ‘वेस्टीबुलर हायपोफंक्शन’ आहे. या आजाराचा सामना करावा लागला आहे. पुढे सांगितले की, कोविड-19 महामारीनंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव होता. वेस्टीबुलर हायपोफंक्शन हा एक वेस्टिब्युलर डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची शिल्लक प्रणाली योग्यरित्या कार्य करत नाही.

 

View this post on Instagram

 

तो म्हणाला, “वेस्टीबुलर हायपोफंक्शन या आजाराला झुंज देत आहे. या आजाराचा सामना करत असलेली व्यक्ती आपल्या शरीराचा तोल सांभाळू शकत नाही.” वरुणने कोविडनंतर काम करण्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

वरुण पुढे म्हणाला, “अलीकडे मी सर्व काही बंद केले आहे. मला काय झालंय हेच कळत नव्हतं. मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाचा आजार झाला होता. यामुळे तुमचे संतुलन बिघडते. पण मी जास्त मेहनत केली… या शर्यतीत आपण नुसतेच धावतोय, पण कुणी विचारत नाही का? मला वाटते की आपण सर्व येथे का आहोत यामागे एक मोठा हेतू आहे. मी माझे शोधण्याचा प्रयत्न करत आहे, आणि मला आशा आहे की मला ही ते सापडेल.” काही दिवसांपूर्वीच आपल्याला हा आजार आहे याचा मी स्वीकार केल्याचं वरुण धवनने सांगितलं. “आयुष्यामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं. पण इथे तर माझ्या शरीराचा तोल जात आहे.” असंही वरुण म्हणाला. वेस्टीबुलर हायपोफंक्शन या आजारामुळे शरीराचा तोल जातो. या आजाराचा परिणाम कानावर तसेच मेंदूवरही होतो. मेंदूवर काही अंशी परिणाम होत असल्याने या आजाराशी सामना करत असलेल्या व्यक्तीला चक्कर येते.

वरुण धवनचा ‘भेडिया’ रिलीज होणार आहे. यामध्ये त्याच्या विरुद्ध कृती सेनन आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. अलीकडेच वरुणने त्याच्या चाहत्यांना हॅलोविन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी भिडेयातील एक नवीन लूक शेअर केला आहे. फोटोमध्ये वरुणचा चित्रपटातील वेअरवॉल्फ लूक पाहायला मिळाला, जो खरोखरच भयानक आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रवीना टंडन हिच्या मोहक अदा, पाहा फोटो

अती घाई संकटात जाई! इमरजेंसी चित्रपटाच्या सेटवर कंगनाचा घरला पाय अन्…

हे देखील वाचा