Wednesday, March 29, 2023

‘भेडिया’ चित्रपटाचा टीझर रिलीज, बघा वरुण धवनचा खतरनाक लूक

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या ‘भेडिया’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. व्हिज्युअल पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता चाहत्यांमध्ये आणखीनच वाढली आहे. अशा या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरसोबतच सिनेमाच्या ट्रेलरची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हे टीझर चाहत्यांना पसंत आला आहे.

चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक त्याच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण या चित्रपटाचा ट्रेलर 19 ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. भेडियाचा टीझर पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. टीझरमध्ये, ‘भेडिया’ची कथा रॅपच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. आपल्या पोटासाठी शेवटी माणसांना मारण्याचे ठरवतो.

 

View this post on Instagram

 

हॉरर आणि जबरदस्त  हे एक उत्तम कॉम्बिनेशन
घनदाट जंगल आणि रॅपने सुरू होणारा हा टीझर हादरवून सोडेल. वरुण टीझर व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात मध्यभागी धावताना दिसत आहे. दुसरीकडे गावातील माणसं प्राणी जाळताना दिसत आहेत. आगीमध्ये लांडग्याचा आकार दिसतो. या चित्रपटात क्रिती सॅनन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मात्र, क्रिती टीझरमध्ये दिसत नाही. हॉरर चित्रपट आणि त्याला मिळालेली जबरदस्त व्हिएफएक्सची जोड हे एक उत्तम कॉम्बिनेशन म्हणता येईल.

या दिवशी भेडिया सिनेमा रिलीज होणार
बॉलिवूडचे चित्रपट आता फक्त रोमान्स, कौटुंबिक कथा यापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत याचा प्रत्यय टीझर पाहिल्यावर येतो. त्यापलीकडे जाऊन बॉलिवूड आता चित्रपट तयार करतेय हे नक्कीच कौतुकास्पद आहे. व्हिएफएक्स आणि स्टोरी लाइनला आता बॉलिवूडही महत्त्व देतेय. भेडिया या पहिला भारतीय क्रिएचर कॉमेडी चित्रपट आहे. या सिनेमाचा ट्रेलर 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित हा सिनेमा 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. टीझर पाहिल्यानंतर आता सिनेमाची उत्सुकता आणखीनच वाढलीय.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

कानाखाली मारु का? नेहा कक्करवर भडकला अनू मलिक
खुशखबर! प्रभासने शेअर केला ‘आदिपुरुष’ सिनेमाचा पोस्टर, ‘या’ दिवशी रिलीज होणार टीझर

हे देखील वाचा