Friday, October 17, 2025
Home कॅलेंडर ‘कुली नं १’ चित्रपटपेक्षा मिम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल, वरुण धवन आणि सारा आली खान वर टीकेचा वर्षाव

‘कुली नं १’ चित्रपटपेक्षा मिम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल, वरुण धवन आणि सारा आली खान वर टीकेचा वर्षाव

अतिशय गाजावाजा करत वरुण आणि साराचा ‘कुली नं १’ हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी ट्रोलिंगचे रिटर्न गिफ्ट दिले.

गोविंदा आणि करिष्मा कपूर यांच्या जुन्या ‘कुली नं १’ सिनेमाचा रिमेक असलेला वरुण, साराचा सिनेमा प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी नाकारला आहे. सोशल मीडियावर या सिनेमाबद्दल अनेक निगेटिव्ह कमेंट्स आणि मिम्स येत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून ते व्हिएफक्स, गाण्यांपर्यंत हा सिनेमा ट्रोल होत आहे. या सिनेमाची आणि वरुण, साराची तुलना जुना ‘कुली नं १’ सिनेमा आणि गोविंदा, करिष्माशी होत आहे.

‘कुली नं १’ चित्रपटाच्या ट्रेलरला देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. वरुण गोविंदाची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला नक्कल देखील जमत नाही इतक्या सडेतोड पद्धतीने लोकांनी टीका केली. काहींनी वरुणला तू आता ही नक्कल करणं बंद करावा असा सल्ला देखील दिला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला. यातच अनेक यूजर्सनी स्टारकिड्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘कुली नं १’ वर नुसती टीका करत लोक थांबले नाहीत. लोकांनी मिम्स नेगटीव्ह कॉमेंट्स सह या कलाकारांना अक्षरशः भंडाऊन सोडले. एक नजर टाकूयात लोकांनी केलेल्या मिम्सवर.

हे देखील वाचा