मागच्या अनेक महिन्यांपासून वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. मागच्या वर्षी वरुण आणि नताशा लग्न करणार होते, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. त्यातच त्यांनी अगदी खाजगी कार्यक्रमात साखरपुडा केल्याच्या बातम्या देखील काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून वरुण आणि नताशा ह्याच महिन्याच्या अखेरीस लग्न करणार असल्याच्या बातम्या खूप येत आहे. या बातम्यांबाबत अजूनपर्यंत तरी दुजोरा मिळाला नव्हता. परंतू आता वरुण धवनच्या काकांनी म्हणजेच अरुण धवन यांनी वरुण आणि नताशाच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे.
एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, याच महिन्याच्या २४ तारखेला वरुण आणि नताशा लग्न करत आहेत. आम्ही सर्व जणं खूप आधीपासूनच या लग्नाची वाट बघत होतो. लवकरच वरुणचे अतिशय सध्या पद्धतीने होणारे हे लग्न अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थित अलिबाग येथे संपन्न होणार आहे. कोरोनाच्या सर्व अटी आणि नियमनाचे पालन करून हा लग्न समारंभ पार पडेल. कोरोनामुळे वरुण आणि नताशा हे अगदी सध्या पद्धतीने लग्न करणार असून या लग्नाला चित्रपटसृष्टीमधून कोणी उपस्थित नसेल असेही त्यांनी सांगितले. फक्त दोन्ही बाजूच्या परिवारातील जवळच्या लोकांच्या उपस्थित हा सोहळा रंगणार आहे.
लग्नानंतर मुंबईत भव्य स्वागतसमारंभ होणार का? या प्रश्नावर अनिल यांनी सांगितले की, सध्या आमचे स्वागत समारंभाबद्दल काहीच ठरले नाहीये. आम्ही आता फक्त लग्नाच्या तयारीत व्यस्त आहोत. जेव्हा आमचे स्वागत समारंभाबद्दल काही ठरेल तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला याबद्दल माहिती देऊ. लग्नाच्या सर्व कार्यक्रमांची सुरुवात २२ जानेवारीपासून होणार असून, कटरीना कैफ, अनिल कपूर, नीतू सिंह, डिजाइनर मनीष मल्होत्रा, मलाइका अरोरा, अर्जुन आणि जाह्नवी कपूर, कियारा आडवाणी, रिया कपूर, हर्षवर्धन कपूर, करण जोहर, दिग्दर्शक शशांक खेतान, जॅकी भगनानी आदी कलाकार वरुणच्या संगीतमध्ये थिरकतांना दिसू शकतात.
वरुण आणि नताशा मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी जरी त्यांच्या नात्याबद्दल कधीच स्वतःहून माहिती दिली नसली तरी, नेहमी हे दोघे एकत्र दिसतात. वरुण आणि नताशा वरुण इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहेत. नताशा फॅशन डिझायनर असून ती स्वतः तिचा लग्नाचा लेहेंगा डिझाइन करणार असल्याचे सांगितले जात आहे.