Thursday, December 5, 2024
Home बॉलीवूड नादचखुळा! कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला ‘वेड’

नादचखुळा! कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला ‘वेड’

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. सध्या वेड या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहेत. चित्रपाटाच्या यशासाठी रितेश आणि जिनेलिया देशमुख यांनी नुकतंच एक पार्टी देखिल ठेवली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दुसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाने नवीन पराक्रम गाजवला आहे. मराठीमधील सर्वाधिक कमाइ करणारा ‘सैराट’ पाठोपाठ वेड हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी तब्बल 20 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर झळकली आहे. त्यामुळे यांची जोडी आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली आहे. वेड चित्रपटाने प्रदर्शनाच्या काही दिवसातच नवे विक्रम रचायला सुरुवात केली आहे. त्याशिवाय रितेशच्या ‘लय भारी’ चित्रपटाचाही रेकॉर्ड तोडला आहे. आता मराठी चित्रपाटामधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत वेड हा दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

 

View this post on Instagram

 

कोरोनानंतर पहिला मराठी चित्रपट आहे ज्याने एवढे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Aadarsh) यांनी दिलेल्या माहितीनुसार वेड हा सर्वाधिक कमाइ करणाऱ्या यादीत पहिला क्रमांक सैराटच आहे. वेड चित्रपटाने (शुक्रवारी) 1.35 कोचींची कमाई केली तर (शनिवारी) 2.72 कोटींचा पार केला आहे. वेड चित्रपटाने शनिवारच्या तुलनेत रविवारी जास्त कमाइ केली आहे अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यत या चित्रपटाने 44. 92 कोटींचा गल्ल जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींचा देखिल टप्पा पार करेल अशी आशा अनेकांना आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बुर्ज खलिफावर झळकला ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर, शाहरुख खानचा उत्साह पाहून चाहते थक्क
‘कांतारा’ फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केली पोस्ट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा