दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावून ठेवलं आहे. मराठीच नाहीत तर बॉलिवूड कलाकारही या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील सर्वाधिक कमाइ करणाऱ्या चित्रपाटांपैकी सैराट नंतर वेड चित्रपटाचे नाव घेतले जाते. शनिवार पर्यत चित्रपटाने 44. 92 कोटींचा टप्पा पार केला असून आता याची क्रमवारी 50 कोटींकडे वळली आहे.
रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित वेड (Ved) चित्रपटाला आणि चित्रपटामधील गाण्यांना डोक्यावर घेतलं आहे. तब्बल 20 वर्षानंतर जिनेनिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. वेड चित्रपटामध्ये जिनेलिया सोबतच अभिनेत्री जिया शंकर (Jia Shankar) हिने देखिल मुख्य भूमिका निभावली आहे. तिची भूमिका देखिल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान रितेश आणि जिनेलिया यांच्या नात्यांबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला आहे. एक जोडपं म्हणून ते इतरांसाठी कसे आदर्श आहेत आणि एवढ्या वर्षानंतरही त्या दोघांच नातं जसंच्या तंस टिकून आहे याबद्दल तिने तिचं मत व्यक्त केलं आहे.
जिया शंकरने सांगितले की, “रितेश आणि जिनेलिया जसे चित्रपटांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात तसेच ते खऱ्या आयुष्यातही खूप खुश आहेत. दोन दशके उलटली तरी त्यांच्यामधलं टिचभर प्रेमही कमी झालं नाही. त्यांच्याकडे पाहून आजच्या तरुन पिढीने काही शिकायला हवं. एक पुरुष त्याच्या जोडीदाराला कशी वागणूक देतो हे रितेश सरकडून खूप शिकण्यासारखं आहे. रितेश सर कोणत्याही महिलेला जशी वागणूक देतता तशी कोणत्याच सेटवर मिळत नाही. त्यांच्या सेटवर वेगळंच आनंदाचं वातावरण असतं.”
त्याच बरोरबर जियाने कामाच्या अनुभवाबद्दल सांगितले की, “मी कोणाचंही नाव घेणार नाही, पण मी बरेच स्वार्थी नट पाहिले आहेत, जे कायम स्वतःच्या कामाकडे लक्ष देतात. त्यांना फक्त त्यांच्या कामाची काळजी असते. समोरची व्यक्ती काय करतेय याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. एखादा सीन करताना माझी जागा घ्यायचा कुणी प्रयत्न केला तर मी तसं होऊ देत नाही.”
अभिनेत्री जिया शंकर हिने वेड चित्रपटापूर्वी टेलिव्हिज क्षेत्रातही काम केलं आहे. त्याशिवाय तिने साउतमधील अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. जियाने वेड चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल अमरिश पुरींच्या नातवाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘बरेच लोक थेट लैंगिक सुखाची…’
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित