Tuesday, July 9, 2024

नाटकाच्या माध्यमातून ‘महाभारत’ जगाला समजून सांगणाऱ्या ब्रिटीश दिग्दर्शकाला देवाज्ञा, सिनेसृष्टीवर शोककळा

कलाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध ब्रिटीश दिग्दर्शक पीटर ब्रूक यांचे रविवारी (दि. ०३ जुलै) निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामासाठी जगभरातून त्यांना प्रेम मिळाले. भारतीय महाकाव्य ‘महाभारत’ हे ब्रूक यांनी इंग्रजी आणि फ्रेंच नाटकाच्या माध्यमातून युरोप आणि अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये पोहोचवले. त्यांच्या निधनावर कलाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

पटकावले अनेक पुरस्कार
पीटर ब्रूक (Peter Brook) यांचा जन्म २१ मार्च, १९२५ मध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना थिएटरमध्ये खूपच रस होता. विशेष म्हणजे, ते इंग्रजी, फ्रेंच थिएटर आणि चित्रपट निर्मातेही होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांना एमी पुरस्कार, लॉरेन्स ऑलिव्हियर पुरस्कार, प्रियम इंपिरियल आणि प्रिक्स इटॅलिया पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी १९६४ साली रॉयल शेक्सपिअर कंपनीसोबत १९६४मध्ये पहिल्या इंग्रजी भाषेच्या प्रॉडक्शनमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

रशियन दांपत्याचे मूल होते पीटर
पीटर यांचे आई-वडील हे मूळचे रशियाचे होते. पीटर यांनी वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी १९४५ साली वयाच्या २०व्या वर्षी ते रॉयल शेक्सपिअर कंपनीचे सर्वात कमी वयाचे दिग्दर्शक बनले. त्यानंतर १९४७ साली इंग्लंडच्या रॉयल ओपेरा हाऊसच्या मुख्य प्रोडक्शनमध्ये दिग्दर्शकाची जबाबदारी खांद्यावर घेतली.

पॅरिसमध्ये जाऊन ब्रूक यांनी बनवली नवीन संस्था
ते १९७० साली ब्रिटनमधून पॅरिसमध्ये काम करण्यासाठी निघून गेले. तिथे त्यांनी इंटरनॅशनल सेंटर ऑफ थिएटर रिसर्चची स्थापना केली. यामुळे एक चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे, अनेक भिन्न राष्ट्रीयतेचे कलाकार आणि डिझायनर एकत्र आले. ब्रूक यांनी त्यांच्या नव्वदीतही काम सुरू ठेवले. त्यांनी २०१७सालच्या त्यांच्या ‘टिप ऑफ द टंग’ या पुस्तकात लिहिले आहे की, “थिएटरच्या प्रत्येक फॉर्ममध्ये आणि डॉक्टरांच्या भेटीमध्ये काहीतरी साम्य असते. बाहेर पडताना, वाटेत येण्यापेक्षा नेहमीच चांगले वाटले पाहिजे.”

विशेष म्हणजे, भारतीय वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची मुलगी मल्लिका साराभाई हिने पीटर ब्रूक यांच्या ‘महाभारत’ या नाटकात द्रौपदी हिची भूमिका साकारली होती. या नाटकावर नंतर सिनेमा बनवण्यात आला होता. या कार्यासाठी तिला २०२१मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ब्रूक्स यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमध्ये, ‘सेव्हन डेज, सेव्हन नाईट्स’, ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

‘या’ दिग्दर्शकापुढे धर्मेंद्र आणि अमिताभ यांचीही बोलती व्हायची बंद, वाचा गाजलेला किस्सा

वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’

‘जवळच्या व्यक्तिनेच बालपणी लैंगिक शोषण केले होते’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा