Tuesday, September 26, 2023

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता गश्मीर महाजनीला पितृशोक! अभिनेता म्हणाला, ‘माझे बाबा…’

मराठी मनोरंजन विश्वातून दु:खत बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. त्यांनी 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककाळा पसरली आहे. रवींद्र महाजनी यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांना चित्रपट सृष्टीत देखणे अभिनेते म्हणुन ओळखले जातात. त्यांनी त्याच्या मुलासोबत ‘पानिपत’ या चित्रपटात काम केले आहे.

2019 मध्ये आलेल्या अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉनच्या ‘पानिपत‘ या चित्रपटातही पिता-पुत्राने एकत्र काम केले होते. या चित्रपटात रवींद्र महाजनी यांनी सरदार मल्हारराव होळकर यांची भूमिका साकारली होती. रवींद्र महाजनी  (Ravindra Mahajani) यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. ‘पानिपत’ या चित्रपटात त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) याने पण काम केले आहे. रवींद्र महाजनी गश्मीरच्या ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटात झळकले होते. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर अभिनेता गश्मीरने पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे.

गश्मीर महाजनी म्हणाला की, “माझे बाबा त्यांच्या काळातील प्रचंड देखणे अभिनेते होते. पण मला तरी वाटत नाही मी त्यांच्या इतका देखणा आहे आणि मी त्यांची बरोबरी करू शकेल. मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की, मी स्मार्ट आहे, मी मुलींना आणि कदाचित मुलांनासुद्धा आवडत असेल. फमाझा एक वेगळा चार्म असेल जो मुलींना आणि कदाचित मुलांनासुद्धा आवडत असेल. पण जो एक परफेक्ट लूक असतो. तो मात्र माझ्याकडे नाही. तो फक्त आणि फक्त माझ्या बाबांमध्ये होता. त्यामुळे मला त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.”

तो पुढे बोलताना म्हणाला की, “मला खूप छान आणि फ्रेश दिसायच आहे. त्यासाठी मला माझे बेस्ट अँगल्स कोणते आहेत ते कॅप्चर करायचे आहेत. स्क्रीनवर जास्त जास्त चांगल कसे दिसता येईल त्यावर मला प्रयत्न करायचे आहेत. पण माझ्यासारखे बाबांना कधी प्रयत्न करावे लागले असतील असं मला वाटत नाही. कारण ते खूप देखणे होते. त्यांना दैवी देणगीच होती.” असे मत गश्मीरने व्यक्त केले आहे. रवींद्र महाजनी यांच्या जाण्याने महाजनी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Veteran actor Ravindra Mahajani, father of Marathi film actor Gashmir, passed away)

अधिक वाचा- 
मैत्री असावी तर अशी! रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ भावूक; म्हणाले, ‘एक जीवलग मित्र…’
‘टॅक्सी ड्रायव्हर’ ते अभिनयातील ‘देवता’! ‘या’ सिनेमाने रवींद्र महाजनी यांचा नऊ वर्षाचा संघर्ष संपवल

हे देखील वाचा