Thursday, June 26, 2025
Home मराठी ‘आयुष्य अपूर्ण आहे मित्रा…’,अनुपम खेर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट

‘आयुष्य अपूर्ण आहे मित्रा…’,अनुपम खेर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 18 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या या जगातून जाण्याने चित्रपटसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे.

काही वेळापूर्वी अनुपम खेर (anupam kher) यांनी विक्रम गोखले (vikram gokhale ) यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ विक्रम गोखले यांनी काही दिवसांपूर्वीअनुपम खेर यांना पाठवला होता. हा व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले की, “व्हिडिओमध्ये विक्रम गोखले यांनी वाचलेली कविता अपूर्ण आहे. हीच गोष्ट सांगण्यासाठी त्यांनी विक्रम गोखले यांना फोन केला असता त्यांनी उत्तर दिले की, ‘आयुष्य अपूर्ण आहे मित्रा.’ असे अनुपम खेर यांनी सांगितले.” विशेष म्हणजे अनुपम खेर आणि विक्रम गोखले खूप चांगले मित्र होते. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विक्रम गोखले प्रत्येकाला ही कविता लक्षपूर्वक ऐकण्याचे आवाहन करताना दिसले. त्यांच्या कवितेत ते म्हणाले, “कुछ यूं है- ना मैं असुर हूं, ना मैं किन्नर हूं. ना मैं यक्ष, ना मैं रक्ष. ना मैं वानर, ना मैं मल्ल, ना मैं निषाद, ना मैं रीछ, ना मैं दानव, ना मैं अहीर, ना मैं जाट, ना मैं गुर्जर, ना मैं अंजना, ना मैं पटेल, ना मैं पाटिल, ना मैं पाटीदार…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

काही दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी आली होती. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. मात्र, काही वेळाने अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असली तरी ते अद्याप जिवंत आहेत.पत्नी वृषाली यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त फेटाळून लावले हाेते. (veteran actor vikram gokhale has died in pune hospital actor anupam kher told the actor heart through vikram gokhale poem)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विक्रम गोखले बनले होते विश्वसुंदरी ऐश्वर्याचे ‘वडील’, अभिनयाने गाजवली तब्बल 4 दशके

दिलीप कुमार यांच्या 100व्या जयंतीनिमित्त फिल्म फेस्टिवलची घोषणा, अभिनेत्याचे सुपरहिट चित्रपट हाेणार प्रदर्शित

हे देखील वाचा