Saturday, May 23, 2026
Home अन्य ब्रेकिंग! मराठी सिनेसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

ब्रेकिंग! मराठी सिनेसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

नुकतंच मराठी सिनेसृष्टीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवार (दि, 11 जानेवारी) रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या दीड वर्षापासून त्या आजारपणाशी झुंझ देत होत्या. मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी आजाराशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला आहे.

पन्नासच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (Chitra Navathe) यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या दीडवर्षापसून त्या आजारीशा झुंज देत होत्या. ‘बोलविता धनी’, ‘गुळाचा गणपती’, ‘राम राम पाव्हणं’, ‘लाखाची गोष्ट’, ‘वहिनीच्या बांगड्या’ सारख्या गाजणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी सिनेसृष्टीमधील सुवर्ण काळ अनुभवनाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रींना नातोवाईक असूनही त्या वृद्धाश्रमात राहत होत्या.

चित्रा नवाथे यांनी आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. चित्रा नवाथे यांचं खरं नाव कुसुम सुखटणकर होते. दादरला मिरांडा चाळीत राहणाऱ्या कुसूम आणि कुमूद सुखटणकर या बहिनी 1945 पासून मराठी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून भूमिका करायला सुरुवात केली होती. गदिमांनी यांचं नाव बदलून चित्रा ठेवलं होतं. ‘लाखाची गोष्ट’ 1952 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजा परांजपे यांनी केलं असून या दोघी बहिनींचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट होता. प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा यांचा विवाह झाला होता. अलीकडच्या काळात त्यांनी ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’ या चित्रपटातही काम केले होते. ‘टिंग्या’ हा चित्रपट त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी केला होता. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळेचे वातावरण पसरले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वेड चित्रपटाचं ‘वेड’ परदेशातही, पाहा व्हायरल व्हिडिओ
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ

हे देखील वाचा