Monday, July 1, 2024

सुचित्रा सेन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर केले राज्य, ‘या’ कारणामुळे नाकारली होती राज कपूर यांची ऑफर

बंगाली चित्रपटात मिसेस सेन या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुचित्रा सेन या कदाचित भारतीय चित्रपट इतिहासातील पहिल्या अभिनेत्री होत्या, ज्यांनी एका लहान मुलीची आई झाल्यावर चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बंगालमध्ये त्यांची लोकप्रियता इतकी होती की, दुर्गापूजेच्या वेळी बनवलेल्या लक्ष्मी आणि सरस्वतीच्या मूर्तींना त्यांचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात होता. सुचित्रा सेन यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे

सुचित्रा (Suchitra sen) यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. त्या करोडो हृदयांवर राज्य करत होत्या. सुचित्रा यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी सध्याच्या बांगलादेशातील पबना जिल्ह्यात झाला. त्यांचे खरे नाव रोमा दास गुप्ता होते. त्यांच्या वडिलांचे नाव करुणमय दास गुप्ता होते. सुचित्रा यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते. सुचित्रा यांनी पबना येथूनच शिक्षण पूर्ण केले.

सुचित्रा सेन यांचे १९४७ मध्ये झाले होते लग्न

सुचित्रा यांनी १९४७ मध्ये बंगालचे प्रसिद्ध उद्योगपती आदिनाथ सेन यांचा मुलगा दिबानाथ सेन यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. सुचित्रा यांना अभिनयाची खूप आवड होती. लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांची इच्छा पूर्ण झाली. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्याचवर्षी त्यांचा ‘सारे चतुर’ हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्यांचा पदार्पण चित्रपट म्हणून ओळखला जातो.

सुचित्रा यांनी अभिनेते उत्तम कुमारसोबत ३० चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुचित्रा यांच्या ६१ चित्रपटांपैकी ३० चित्रपट त्यांनी उत्तम कुमारसोबत केले ही एक वेगळी गोष्ट आहे. त्याच्या अभिनयाचे लोक इतके वेडे होते की, बॉलिवूडच्या निर्मात्यांनाही त्याला आपल्या चित्रपटात घ्यायचे होते. १९५५ मध्ये आलेल्या ‘देवदास’ चित्रपटातूनही त्यांना ही संधी मिळाली. हा चित्रपट सुचित्रा यांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्याच हिंदी चित्रपटात त्यांना दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील सुचित्रा यांचे काम खूप आवडले होते. या चित्रपटानंतरच त्या एक मोठ्या स्टार बनल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हा चित्रपट हिट होताच सुचित्रा यांना चित्रपटांची ओढ लागली.

‘बिपाशा’साठी हिरोपेक्षा मिळाली जास्त फी 

सुचित्रा चित्रपटांमधील फीसमुळे चर्चेत होत्या. १९६२ मध्ये ‘बिपाशा’ चित्रपटासाठी सुचित्राला हिरोपेक्षा जास्त फी मिळाली होती. माध्यमांतील वृत्तानुसार, या चित्रपटासाठी त्यांना त्यावेळेस १ लाख रुपये मिळाले होते, तर चित्रपटाचा नायक उत्तम कुमारला केवळ ८० हजार रुपये मिळाले होते.

सुचित्रा कधीच चित्रपट निर्मात्यांच्या मागे धावली नाही, असेही म्हटले जाते. ज्या निर्मात्यांसोबत बाकीच्या नायिका काम करण्यास उत्सुक होत्या, सुचित्रा त्यांचे चित्रपट नाकारत असत. सुचित्रा यांनी चित्रपट निर्माते राज कपूर यांची ऑफरही नाकारली. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. पण सुचित्रा सेन यांनी तो चित्रपट नाकारला होता. कारण त्यांना राजसाहेबांची झुलताना फुले देण्याची स्टाईल आवडली नाही.

२०१४ मध्ये घेतला अखेरचा श्वास

सुचित्रा सेन यांनी १९७८ मध्ये ‘प्रणोय पाश’ या चित्रपटात शेवटचे काम केले होते. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केला आणि रामकृष्ण मिशनची सदस्य बनली. या काळात त्यांनी अनेक समाजसेवेची कामेही केली. १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सुचित्रा सेन यांनी २०१४ मध्ये कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा :

हे देखील वाचा