Monday, November 25, 2024
Home कॅलेंडर भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्रू अनावर; म्हणाले, ‘दिदी तुम्ही…’

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्रू अनावर; म्हणाले, ‘दिदी तुम्ही…’

महान गायिका लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. (Lata Mangeshkar Passes Away) वयाच्या ९२व्या वर्षी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी संपूर्ण विश्वभर पसरली आणि सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजलीचा ओघ सुरु झाला.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) रविवार (६ फेब्रुवारी) रोजी सकाळी ८ वाजता लतादिदींची प्राणज्योत मावळली. लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. (Veteran Singer Lata Mangeshkar Passes Away At Mumbai Reactions From PM Narendra Modi)

काय म्हणाले नरेंद्र नोदी….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे,

हेही वाचा – एका युगाचा अंत…! गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन, कलाविश्वावर शोककळा

 

लता दिदी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. (Lata Mangeshkar Passes Away At Mumbai)

तब्बल महिन्याभरापासून सुरु होते उपचार…

दिनांक ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर (Veteran Singer Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालय (Breach Candy Hospital) येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान काही दिवसांनंतर त्या कोरोनातून (Corona) बऱ्या झाल्या होत्या. (Lata Mangeshkar Cororna Positive) तसेच, त्यांची तब्येतही सुधारल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. परंतू, कोरोनासह त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती, ज्यावर उपचार सुरु होते. अन् त्यामुळेच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली.

दिदींची तब्येत अचानक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना शुक्रवारी (५ फेब्रुवारी) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसन यंत्रणा – Ventilator) ठेवले. ‘लतादिदींची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांनी दिली होती. मात्र, अखेरीस उपचारादरम्यान ९२ वर्षीय भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. (Veteran Singer Bharat Ratna Lata Mangeshkar Passes Away)

लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास…

मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर या दांपत्याच्या घरात इंदौर येथे दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. अगदी लहान वयापासूनच लतादिदींनी गायकीला सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून आणि नंतर बॉलिवूड, मराठी या सिनेक्षेत्रासह अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गोड आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अनेक दशके त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली नव्हे तर त्यांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनात हजारो गाणी गायली, ज्यातील काही गाणी लतादिदींप्रमाणेच अजरामर आहेत. लतादिदींनी अगदी लहानपणापासूनच संगीत हेच आपले आयुष्य बनवले. संगीत, जे कधी आपल्याला हसवते तर कधी आपल्या डोळ्यातून अश्रु आणते. अशा दोन्ही आवाजांची देणगी लता मंगेशकर यांना लाभली होती.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा