राज कुंद्राला अटक झाल्यापासून इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील चित्रपटाच्या बाबतीत आणि लैंगिक शोषणाच्या बाबतीत अनेक बातम्या समोर येत आहेत. या ग्लॅमर क्षेत्रातील ही काळी बाजू या क्षेत्राचे नाव खराब करते. मात्र ही काळी बाजू आज सर्वाना माहित आहे. काम मिळवण्यासाठी आणि टिकण्यासाठी अनेक कलाकरांना अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. काही कलाकार हिंमतीने समोर येतात आणि या गुन्ह्याच्या विरोधात आवाज उठवतात. या प्रकरणामध्ये अनेक मोठी मोठी लोकं सामील असतात.
आता पुन्हा एकदा एका मोठ्या व्यक्तीचे नाव लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये घेतले गेले आहे. ती व्यक्ती आहे, विभू अग्रवाल. विभूवर एका महिलेने लैंगिक शोषणाचा मोठा आरोप केला आहे. या आरोपामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून, विभू विरोधात पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विभू यांची ‘उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी आहे. या कंपनीमध्ये अडल्ट कंटेंट तयार केला जातो. प्राप्त माहितीनुसार कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैनावरही गुन्हा दाखल झाला आहे. ४ ऑगस्ट २०२१, बुधवार रोजी या दोन्ही आरोपींविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | Police have registered a case against Vibhu Agrawal, the CEO of film production company Ullu Digital Pvt Ltd for allegedly sexually harassing a woman, under Section 354 of IPC in Mumbai. Anjali Raina, the company's country head has also been booked: Mumbai Police
— ANI (@ANI) August 5, 2021
विभू अग्रवालने २०१३ साली ‘बात बन गई’ या बॉलिवूडपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर त्याने २०१८ मध्ये ‘उल्लू’ हे ऍप लाँच केले. या ऍपवर हिंदी, इंग्रजीसोबतच भोजपुरी, बंगाली, पंजाबी, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि गुजराती भाषांमध्ये कार्यक्रम दाखवले जातात.
एका मुलाखतीमध्ये विभू यांनी सांगितले होते की, ‘आम्हाला उल्लूबद्दल लोकांचं मत बदलायचे आहे. उल्लू हे नाव घेतले तरी लोकांच्या मनात एकच विचार येतो, तो म्हणजे प्रौढ चित्रपट. आमचेही एक कुटुंब आहे आणि आम्हाला ते बदलायचे आहे.’ सोबतच ते असे देखील म्हणाले होते की, हे असे सिनेमे करण्यासाठी कोणावरही दबाव आणला जात नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला










