Tuesday, July 9, 2024

तब्बल ४० लाखांची कार, ५० लाखांचा डायमंड नेक्लेस, वाचा अंकिताला गिफ्टमध्ये काय काय मिळालेलं

लग्न लग्न आणि फक्त लग्न. आपल्या आजूबाजूचं तर सोडाच ओ. सिनेसृष्टीतही जणू हा एकच शब्द ऐकायला मिळतोय. यातही छोटा आणि मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनेही व्यावसायिक विकी जैनसोबत संसार थाटलाय. विकी आणि अंकिताने आपलं लग्न थाटामाटात पार पाडण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. त्यांनी डिझायनर ड्रेस आणि महागडी ज्वेलरीही परिधान केलेली. अंकिताच्या या लग्नात मित्र, नातेवाईक आणि अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली, पण मंडळी आता तुम्हीही म्हणाल, लग्न तर केलंय मग एवढी चर्चा कसली? लग्न तर झालंचंय, पण या लग्नात अंकिताला मित्रमंडळी आणि कलाकारांकडून मिळालेल्या खास गिफ्ट्सने सर्वांचे लक्ष वेधलंय. अंकिता लोखंडेला गिफ्ट म्हणून काय काय गोष्टी मिळाल्यात, ते जाणून घेऊ.

टीव्ही प्रेझेंटर- अभिनेता रित्विक धजनानीने आणि अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. दोघे चांगले मित्रमैत्रीण असून रित्विकने अंकिताला तिच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा तर दिल्याच. पण सोबतच १५ लाख किंमतीच्या घड्याळाचा सेटही गिफ्ट म्हणून दिला.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिष्टीने अंकिताचं लग्न खूप चांगल्या पद्धतीनं एन्जॉय केलं. अंकिताच्या या लग्नात मिष्टीने तिला १० लाख रुपयांचा सोन्याचा नेक्लेसही गिफ्ट म्हणून दिला.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफनेही अंकिताला चांगलंच महागडं गिफ्ट दिलंय. त्यानं अंकिताला ४० लाख रुपयांची मिनी कूपर ही कार गिफ्ट केली आहे. विशेष म्हणजे अंकिता आणि टायगरने ‘बागी ३’मध्ये एकत्र कामही केलंय.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अंकितानेही ‘बागी ३’ चित्रपटात एकत्र काम केलंय. त्यामुळे अंकिता आणि श्रद्धा दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. अंकिताच्या लग्नात श्रद्धा कपूरनं तिला ८ लाख रुपयांचं डायमंड ब्रेसलेट गिफ्ट केलं.

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री माही विज आणि अंकिता या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा पार्टी आणि फंक्शन्समध्ये एकत्र दिसतात. माहीने अंकिताला लग्नाचे गिफ्ट म्हणून प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीची सुंदर साडी दिली. या साडीची किंमत १५ लाख रुपये आहे.

‘पवित्र रिश्ता’मध्ये अभिनेता शाहीर शेख आणि अंकिताने एकत्र काम केलंय. अंकिताला लग्नाचे गिफ्ट म्हणून त्याने २५ लाख रुपये किंमतीचं सोन्याचं ब्रेसलेट दिलंय.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध प्रोड्यूसर एकता कपूरला अंकिताचा अभिनय खूप आवडतो. अंकिताही एकताचा आदर करते. एकताने अंकिताला तिच्या लग्नाची गिफ्ट म्हणून डायमंडचा नेक्लेस दिलाय. याची किंमत आहे ५० लाख रुपये.

अंकिताच्या जवळच्या मैत्रिणींमध्ये सृष्टी रोड या अभिनेत्रीचाही समावेश होतो. दोघी पार्ट्यांदरम्यान एकत्र स्पॉट होतात. सृष्टीने अंकिताला लग्नाच्या शुभेच्छांसह ५ लाख रुपये किंमतीची सोन्याची चैनही दिलीय.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने अंकिताच्या बॅचलर्स पार्टीला हजेरी लावली होती. पण सध्या ती ‘बिग बॉस १५’मध्ये आहे. त्यामुळे तिला लग्नात सामील होता आलं नाही. असं असलं, तरीही रश्मीने प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांची सुंदर साडी अंकिताला गिफ्ट केली. या साडीची किंमत ही १० लाख रुपये आहे.

हे झालं टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांच्या गिफ्टबद्दल. पण खरी मजा तर पुढं आहे. अंकिताला पती विकी जैनकडून सर्वात महागडं गिफ्ट मिळालंय. ते ऐकल्यानंतर तुमच्याही भुवया उंचावतील.

विकीचं अंकितावरील प्रेम आपल्या सर्वांनाच माहितीये. त्यानं आपल्या पत्नीला मालदीवमध्ये एक प्रायव्हेट व्हिला गिफ्ट केलाय. या व्हिलाची किंमत आहे तब्बल ५० कोटी रुपये.

अंकिताही काही कमी नाहीये. अंकिताने आपल्या पतीला काय गिफ्ट दिलं ते जाणून घेऊ. तिनं आपल्या पतीला एक आलिशान याट म्हणजेच नौका गिफ्ट केलीय. या नौकेची किंमत तब्बल ८ कोटी रुपये आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘सैराट’ ते ‘लय भारी’, वाचा कोणत्या सिनेमानंं केलीय किती कमाई? दुनियादारीने तर बजेटच्या ६ पट छापलेत

चाहत्यांच्या काळजाला चटका लावून कलाकारांनी घेतली एक्झिट! ‘या’ दिग्गजांच्या निधनाने हादरली सिनेसृष्टी

साताजन्माच्या गाठी! तिकडं काहीही होऊद्या, पण २०२१मध्ये लग्न थाटून मजेत आहेत ‘हे’ कलाकार

हे देखील वाचा