Sunday, April 14, 2024

अंकिता लोखंडेशिवाय ‘या’ महिलांशीही होते सुशांतचे संबंध, चौथा क्रमांकाची तर होती हृदयाच्या जवळ । Sushant Singh Rajput

सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) चाहत्यांना अजूनही विश्वास ठेवणे कठीण जात आहे की, अभिनेता आता या जगात नाही. त्याचे चाहते प्रत्येक क्षणी त्याची आठवण काढत असतात. सुशांतच्या आठवणीत सोशल मीडियावर अनेकदा अभिनेत्याचे नावही ट्रेंड होऊ लागते. आज (१४ जून) सुशांत सिंग राजपूतचा तिसरी पुण्यतिथी आहे.

त्याचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रमंडळी सर्वच भावूक झाले असून, सर्वांना त्याची उणीव भासत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती भलेही प्रसिद्धीच्या झोतात आली असेल, पण सुशांतच्या हृदयात अंकिता लोखंडेची जागा नेहमीच खास होती. दोघांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली होती आणि अनेकवेळा ते एकत्र दिसले होते. अंकिता आणि सुशांतच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांनाही दु:ख झाले होते. पण सुशांतच्या आयुष्यात फक्त अंकिता लोखंडेच नाही, तर त्याच्या हृदयाच्या खूप जवळ असलेल्या इतरही महिला होत्या. (sushant singh rajput had a connection with these women)

क्रिती सेनन (Kriti Sanon)
अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, सुशांतचे नाव क्रिती सेननशी जोडले गेले. ‘राबता’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात होते. मात्र, दोघांनीही हे कधीच मान्य केलेले नाही. मात्र, ‘राबता’ही काही खास करू शकला नाही आणि दोघे वेगळे झाले.

सारा अली खान (Sara Ali Khan)
सुशांतने सारा अली खानसोबत ‘केदारनाथ’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्यात दोघांची जोडीही चांगलीच गाजली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र नंतर दोघेही वेगळे झाले.

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)
हे नाव कोणाला माहीत नाही? सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर सुशांतच्या वडिलांनी रियाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर एनसीबीने तिला अटक केली आणि ड्रग्ज खरेदी आणि वापरल्याचा आरोप केला. सुशांत आणि रियाने कधीही उघडपणे हे नाते स्वीकारले नव्हते. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर तो रिया चक्रवर्तीला डेट करत असल्याचे समोर आले होते.

सुशांतच्या बहिणी
अभिनेता सुशांत सिंग राजपूत चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. नीतू सिंग, मीतू सिंग, प्रियांका सिंग आणि श्वेता सिंग कीर्ती या सुशांतच्या मोठ्या बहिणी आहेत. सुशांत त्याच्या बहिणींचा खूप लाडका होता. कोणत्याही मुलाखतीत तो त्यांचा उल्लेख नक्कीच करायचा. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बहिणींनी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खूप मेहनत घेतली. आजही त्याच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेत्याची बहीण श्वेता हिने एक पोस्ट शेअर करून त्याची आठवण काढली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा