कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल


कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या आधीच्या सर्व फंक्शनला ७ डिसेंबरपासून राजस्थानमधील सवाई माधेपूर इथे सुरुवात झाली आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चा अगदी कानाकोपऱ्यात देखील होत असून, सर्वांनाच त्यांना एकत्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ९ डिसेंबर २०२१ रोजी विकी आणि कॅटरिना विवाहबंधनात अडकणार असून, त्यांचे लग्न राजस्थान येथील ‘सिक्स सेंस फोर्ट’ बरवारा इथे संपन्न होणार आहे. या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यासर्वांमधे त्यांच्या बालपणीच्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

कॅटरिना आणि विकी यांचे बालपणीचे थ्रोबॅक फोटो अनेकांनी रिपोस्ट केले असून, त्यावर नेटकऱ्यांच्या एकापेक्षा एक प्रतिक्रिया उमटत आहे. ७ डिसेंबरला कॅटरिना आणि विकी यांचे संगीत फंक्शन झाले तर ८ डिसेंबरला कॅटरिना आणि विकीचे मेहेंदी फंक्शन असणार आहे. यासाठी सेलिब्रिटी मेहेंदी आर्टिस्ट वीणा नागदा देखील राजस्थानमध्ये पोहचल्या आहेत.

तसे पाहिले तर कॅटरिना आणि विकी यांच्या लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी लग्नाच्या जोरदार तयारी सुरु होत्या. कॅटरिना आणि विकी जेव्हा जयपूरची रवाना झाले तेव्हा त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे दोघेही हिंदी पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

vicky and katrina
Photo Courtesy: Instagram/katrinakaif & vickykaushal09

या लग्नाला आलेल्या पाहुण्यांसाठी असलेली एक वेलकम न देखील नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या नोटमध्ये लिहिले आहे की, “अखेर तुम्ही इथे आला आहात. जयपूरपासून रणथंबोरपर्यंतची रोड ट्रीप तुम्ही एन्जॉय कराल, अशी आम्हाला आशा आहे! तुमच्यासाठी व्यवस्था करण्यात आलेल्या रिफ्रेशमेंटचा आनंद घ्या. निवांत बसा आणि या धम्माल गोष्टीचा आनंद लुटा! आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचे फोन आपापल्या खोल्यांमध्येच ठेवावेत. कोणत्याही विधी वा कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर टाकू नका. तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही आतुर आहोत. रिगार्ड्स..शादी स्क्वाड” कॅटरिना आणि विकी यांनी त्यांचे लग्न अतिशय खासगी ठेवले आहे. लग्नाची कोणतीही माहिती बाहेर येऊ नये यासाठी ते खूप काळजी घेत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!