बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची सध्या इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा चालू आहे. ते दोघे पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार त्या दोघांचा रोका देखील झाला आहे. एवढंच नाही तर त्या दोघांनी त्यांच्या लग्नाच्या कपड्यांची ऑर्डर देखील दिली आहे.
अशातच त्याच्या लग्नाच्या चर्चेमध्ये विकीची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीने तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले की, विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाने तिला काहीही फरक पडत नाही. विकी आणि हरलीनच्या एका जवळच्या व्यक्तीने ही माहिती दिली आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, हरलीन आता या सगळ्यापासून खूप पुढे गेली आहे आणि आता ती तिच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे. (Vicky kaushal and katrina kaif’s wedding, his ex girlfriend Harleen Sethi give reaction)

हारलीन सेठी एकता कपूरच्या ‘द : टेस्ट केस २’ मध्ये काम करण्यासाठी खूप उत्साहित आहे. तिने नुकतेच एका चित्रपटातील गाण्याची शूटिंग पूर्ण केली आहे. हरलीनने एकता कपूरचा वेब शो ‘ब्रोकन बट ब्युटीफूल’ मध्ये काम करून खूप नाव कमावले.
हरलीन आणि विकीने अनेक वर्ष एकमेकांना डेट केले आहे. २०१९ साली त्या दोघांचे ब्रेकअप झाले. हरलीनने त्यांच्या ब्रेकअपचे कारण विकीचे वागणे बदलले होते, असे सांगितले. तिने सांगितले की, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटानंतर विकीचे वागणे खूप बदलले होते. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे दोघे राजस्थानमध्ये लग्न करणार आहे. चौथच्या बरवाडामध्ये असलेल्या किल्ल्यावर ते लग्न करणार आहेत. हा किल्ला १४ व्या शतकातील असून, ८०० वर्ष जुना आहे. हा किल्ल्याचे नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर केले गेले आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्यांचे हे रॉयल वेडिंग या हॉटेलवर होणार आहे. ७ ते १२ डिसेंबर दरम्यान त्यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम होणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार
–श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये
–कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव