Thursday, April 18, 2024

छावा सिनेमात विक्की कौशलबरोबर दिसणार ‘ही’ अभिनेत्री, साकारणार महाराणी येसुबाईंचं पात्र

छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनावर आधारीत छावा सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमामध्ये अभिनेता विक्की कौशल हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. महाराजांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सध्या विक्की कौशल प्रचंड मेहनत घेताना दिसतोय. या सिनेमात दोन मुख्य कलाकार देखील विक्कीबरोबर दिसणार आहे. दक्षिणेतील एक सुपरस्टार या येसुबाईंची भूमिका करताना दिसेल. (Vicky Kaushal cast opposite Rashmika Mandanna to play Chhatrapati Sambhaji Maharaj)

महाराजांची भूमिका परफेक्ट करण्यासाठी घेतोय कष्ट
विक्की कौशल (Vicky Kaushal) बाॅलिवूडचा नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता. कोणत्याही चित्रपटामधील त्याची भुमिका तो शानदार पद्धतीने पार पाडतो. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा “सॅम बहादूर” हा सिनेमा प्रदर्शित झाला. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशाॅ यांच्या जिवनावर आधारित या चित्रपटातील विक्कीच्या भुमिकेने प्रत्येकालाच भुरळ घातली. सॅम मानेकशाॅ यांचं पात्र त्याने जीवंत केलं होते. हा अभिनेता आता त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागलाय. यासाठी तो जिममध्ये घाम गाळताना दिसतोय. विक्कीच्या सोशल मीडिया पोस्टवरून, तो या पात्रात एकरूप होण्यासाठी किती मेहनत घेतोय याचा अंदाज नक्कीच लावला जावु शकतो.

इंस्टाग्राम पोस्ट होेतेय व्हायरल (Vicky Kaushal’s Instagram post gets viral)
छावा ही एक पीरियड एक्शन ड्रामा फिल्म आहे. ज्यात विक्की छत्रपती संभाजी महाराजांची भुमिका पार पाडणार आहे. नुकतेच इंस्टाग्राम अकांउंटवर विक्कीने एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तो वर्कआउट करताना दिसतोय. तो वेट लिफ्टींग करताना आणि त्याचे वर्कआउट गोल्स पुर्ण करताना दिसतोय. याच सोबत त्याने कॅप्शनमध्ये “छावा” असंही लिहिलंय.

पहिल्यांदाच करतोय पीरियड ड्रामा फिल्म
छावा (Chaawa) या चित्रपटाच्या माध्यमातुन विक्की पहिल्यांदाच पीरियड ड्रामा फिल्ममध्ये काम करणार आहे. तो या पात्राच्या तयारीत कोणतीही कसर सोडु इच्छीत नाही. काही दिवसांपुर्वी इंटरव्यू दरम्यान या चित्रपटाविषयी बोलाताना विक्की म्हणाला, ‘ही एक पीरियड ड्रामा फिल्म आहे आणि ही माझ्यासाठी पहिली संधी आहे. हा सिनेमा आम्ही खुप गंभीरतेने बनवत आहोत. यात खुप ॲक्शन आहे, भरपूर ड्रामा आहे आणि इमोशन्सने भरलेली ही एक शानदार कथा आहे.’

येसुबाईंच्या भूमिकेत दिसणार रश्मिका मंदाना
विक्की कौशल पाठिमागे म्हणाला होता की, त्याला ॲक्शन हिरो बनायचं आहे. छावा या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. उतेकर मराठी व हिंदी अशा दोनही चित्रपटांचे दिग्दर्शक राहिले आहेत. टपाल, लालबागची राणी, लुकाछुपी, मीमी आणि जरा हटके, जरा बचके हे त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे. उतेकर आणि विक्की तिसऱ्यांदा एकत्र येत आहेत. या चित्रपटात विक्की कौशल सोबतंच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) देखील दिसणार आहे. ती चित्रपटात येसुबाई भोसलेंचे पात्र करताना दिसेल. रिपोर्टनुसार अक्षय खन्ना औरंगजेबच्या भुमिकेेत दिसण्याची शक्यता आहे. यासोबतच अशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि प्रदीप सिंह रावत यांसारखे कलाकार देखील या चित्रपटाचे भाग असणार आहेत. (Akshaye Khanna set to play Aurangzeb in the Vicky Kaushal- Rashmika Mandanna starrer Chhawa)

हे देखील वाचा