नॉर्वेच्या ओस्लो येथे बॉलिवूड महोत्सवाची 20वी आवृत्ती (एडिशन) पार पडली. यामध्ये चित्रपट दिग्दर्शक-अभिनेते राहुल मित्रा, ऍक्शन दिग्दर्शक शाम कौशल आणि प्रसिद्ध लेखक, अभिनेते-दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. लाेरेन्सकाेग कल्टुरहस केंद्र येथे आयोजित एका शानदार पुरस्कार सोहळ्यात लोरेन्सकोगचे महापाैर रॅगनहिल्ड बर्गहाईम यांनी शाम कौशल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, सौरभ आणि राहुल यांना भारतीय चित्रपट उद्योगातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
शाम काैशल यांनी सर्वांना दिला हा संदेश
शाम काैशल (Sham Kaushal) यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यासोबत चार दशकाहून अधिक काळ काम करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले. यावेळी त्यांनी सर्वांना ‘स्वप्न बघणे बंद करू नका’, असा संदेश दिला.
सौरभ शुक्ला- राहुल मित्राने शेअर केला अनुभव
सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) यांनी आपल्या श्रीमंत बनण्याचा प्रवास सांगितला. ते म्हणाले की, “जेव्हा काही वर्षांपूर्वी ते मुंबईला आले, त्यावेळी त्यांनी पाहिलेले सर्व स्वप्न पूर्ण झाले.” ते पुढे म्हणाले, “माझ्यासाठी हे श्रीमंत हाेण्यासारखे आहे.” राहुल मित्रांनी ईरानी अभिनेता सॅम नॅारी, हेलिया इमामी आणि शरीफिनियासाेबत भारतीय सिनेमाला सर्वात मजबूत सॉफ्ट पाॅवर सांगितले. तसेच, देशाची सांस्कृतिक मुत्सद्दीगिरी वाढवण्याचे प्रमुख साधन म्हणून त्याची भूमिका अधोरेखित केली.
View this post on Instagram
शाम कौशल यांनी ‘या’ दिग्गज अभिनेत्यांसाेबत केले काम
शाम कौशल बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याचे वडील आहेत. शाम हे बाॅलिवूडमधील प्रसिद्ध ऍक्शन दिग्दर्शक आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, शाम कौशल यांना नाना पाटेकर यांनी आपल्या ‘प्रहार’ चित्रपटात संधी दिली हाेती. मात्र, ऍक्शन दिग्दर्शक म्हणून ‘इंद्रजालम’ (मलयालम) हा त्यांचा पहिला चित्रपट हाेता. त्यांनी अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अमरीश पुरी, गोविंदा, ऋषी कपूर, अक्षय कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसाेबत ऍक्शन दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पनवेलच्या फार्महाऊसची रेकी करून बिश्नोई गँगने केलेला बंदोबस्त; सलमानच्या हत्येसाठी काय होता ‘प्लॅन बी’
‘तारक मेहता’ मालिका सोडून ‘या’ कलाकारांनी केली घोडचूक, लोकप्रियतेपासून राहिले दूर
रिचा चड्ढाच्या चाहत्यांनी अली फजल सोडून भलत्याच अलीसोबत बनवली जोडी, अभिनेत्रीने ट्वीटद्वारे दिले उत्तर