Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बापरे बाप! क्यूट कपल विकी कौशल आणि कॅटरिना कैफने घेतली एवढ्या उंचीवरुन घेतली उडी, व्हिडिओ व्हायरल

कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Viki Kaushal) हे हिंदी सिने जगतातील पावरफुल कपल म्हणून ओळखले जाते. त्यांच्या दमदार केमिस्ट्रीची आणि प्रेमप्रकरणाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत असते. अलिकडेच अभिनेत्री कॅटरिना कैफने आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. कॅटरिनाच्या वाढदिवसानिमित्त सध्या ती पती विकी कौशलसोबत सुट्टीची मजा घेताना दिसत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये विकी आणि कॅटरिना आपल्या मित्रांसोबत मालदीवमध्ये सुट्टीची मजा घेताना दिसत आहेत. 

अभिनेत्री कॅटरिना कैफ ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या अभिनेत्री पती विकी कौशलसोबत मालदीवमध्ये सुट्टीची मजा घेताना दिसत आहे. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये विकी कौशल आणि कॅटरिना कैफ आपल्या मित्रांसोबत तसे फॅमिली सदस्यांबरोबर अनेक साहसी खेळ खेळतानाही दिसत आहेत. ज्याचा एक व्हिडिओ अभिनेता विकी कौशलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.

विकी कौशलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये विकी कौशल त्याच्या मित्रपरिवारासोबत एडवेंचर्स गेम खेळताना दिसत आहेत. अनेक साहसी खेळांचा हा विकी कौशलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत विकीने माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे क्षण असा सुंदर कॅप्शन दिला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. याआधी अभिनेत्री कॅटरिना कैफनेही आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन मालदीवमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

 

दरम्यान अभिनेत्री कॅटरिनाने १६ जुलैला आपला वाढदिवस वाढदिवस साजरा केला. त्याचदिवशी ती सुट्टींसाठी मालदीवली रवाना झाली होती. वाढदिवस संपला तरी कॅटरिनाची सुट्टीची मजा काही संपली नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर कॅटरिनाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर ३’ चित्रपटात झळकणार आहे.

हे देखील वाचा