Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘नाच पंजाबन’ गाण्यावर विकी कौशलने केला धमाकेदार डान्स, कॅटरिनाने कमेंट करत लिहिले…

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसतात. कलाकार देखील आपल्या मित्रांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत त्यांना पाठिंबा देतात. लवकरच वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांचा बहुचर्चित असा ‘जुग जुग जियो’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत असून, काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरवरून सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सिनेमाच्या जोरदार ट्रेलरनंतर या चित्रपटातील ‘नाच पंजाबन’ हे पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. पहिल्याच गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवली असून, गाणे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर नेटकरी विविध रिल्स बनवताना देखील दिसत आहे. या रिल्स बनवण्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकार तरी कसे मागे राहणार. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता असलेल्या विकी कौशलने देखील या ‘नाच पंजाबन’ गाण्यावर एक मजेशीर रील बनवले आहे. या रिलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, विकीचा डान्स आणि त्याचा अंदाज लोकांना चांगलाच भावत आहे. या व्हिडिओमध्ये विकी या गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहे.

विकीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आधी विकी डान्स करत कॅमेऱ्यासमोर येतो आणि त्यानंतर त्याचा मित्र देखील त्याला जॉईन करतो. हा व्हिडिओ शेअर करताना विकीने लिहिले, “जितके हे पंजाबी होऊ शकत होते. माझ्या भावासोबत नाच पंजाबन गाण्यावर डान्स करून खूपच मजा आली. टीमला आमच्याकडून खूप प्रेम आणि शुभेच्छा.” या व्हिडिओवर फॅन्ससोबतच कलाकार देखील भरभरून कमेंट्स करताना दिसत आहे. विकीची पत्नी असलेल्या अभिनेत्री कॅटरिना कैफने देखील यावर कमेंट केली आहे.

कॅटरिनाने तिच्या कमेंटमध्ये लिहिले, “@bindraamritpal तू मारून टाकलेस” याशिवाय वरुण धवन, अनिल कपूर आदींनी देखील यावर कमेंट्स करत दोघांचे कौतुक केले आहे. जुग जुग जियो सिनेमात वरुण आणि कियारासोबत अनिल कपूर, नितु सिंग, मनीष पॉल आणि प्राजक्ता माळी देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा