Wednesday, December 6, 2023

KK Birth Anniversary | अगदी साधेसरळ होते गायकाचे आयुष्य, बालमैत्रिणीशी केला होता विवाह

‘हम रहें या न रहें कल, कल याद आएंगे ये पल’ ही गाणी जेव्हा जेव्हा कानात गुंजते किंवा कुठेही आवाज येतो तेव्हा गायक केके उर्फ ​​कृष्णकुमार कुन्नथ नेहमी लक्षात राहतो. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या चितेची आग अजूनही थंडावली नव्हती की, केके यांच्या निधनाच्या बातमीने हादरून गेली होती. आज (दि. 23 ऑगस्ट)  गायक केकेंचा जन्मदिवस, जाणून घेऊया त्यांच्या संगीतमय प्रवासाबद्दल.

गायक केके (KK) यांचे ३१ मेच्या मध्यरात्री निधन झाले. कोलकाता येथे एका कॉन्सर्ट दरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले गेले होते.

केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ (Krushnakumar Kunnath) अतिशय साधे जीवन जगले. ते कधीही मद्यपान करत नव्हते आणि धूम्रपानही करत नव्हते. मीडिया आणि ग्लॅमर लाइफपासूनही ते दूर असायचे. अशा परिस्थितीत केकेला असे सोडून जाण्याने हृदयावर एक न भरून येणारी जखमच म्हणावी लागेल.

दि. 23 ऑगस्ट 1968 रोजी जन्मलेल्या केकेचे पालनपोषण दिल्लीत झाले. दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूल आणि किरोरी माल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने काम केले आणि नंतर 1994 मध्ये ते मुंबईला गेले. केकेने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी केकेने सुमारे 3500 जिंगल्स गायल्या. केकेने लेस्ले लुईस यांना आपला गुरू मानले. पण ए.आर. रहमानच्या कल्लुरी साले आणि हॅलो डॉ. या हिट गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक मिळाला.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ‘तडप तडप’ गाण्याने केकेला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. याआधी त्यांनी ‘माचीस’ चित्रपटातील ‘छोड आये हम वो गल्लियाँ’ या गाण्यात छोटासा भाग गायला होता. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच केकेने लग्न केले. त्यांनी 1991 मध्ये बालपणीच्या ज्योतीशी लग्न केले. त्यांचा मुलगा नकुल कृष्ण कुन्नथ हा देखील गायक आहे. नकुलने केकेसोबत त्याच्या ‘हमसफर’ अल्बममधील गाणे गायले आहे. केकेला तमारा नावाची मुलगी देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
केकेची एकूण कमाई जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, रोज खेळायचा लाखोंमध्ये
भांडं फुटलं रे! तेजस्वी प्रकाश अन् करण कुंद्राने गुपचूप केलं लग्न? ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र माजली खळबळ

हे देखील वाचा