Friday, July 5, 2024

यूरोपच्या जंगलांमध्ये बंडखोरीच्या प्रयत्नात दिसला अभिनेता विकी कौशल, फोटो व्हायरल

विकी कौशल हा हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. खूप कमी काळात त्याने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचे या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये नाव तयार केले. ‘मसान’ चित्रपटात आपल्या जिवंत अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या विकीने, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमानंतर त्याच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. इंडस्ट्रीमधील व्यस्त कलाकारांच्या यादीत विकीचा देखील समावेश आहे. सध्या त्याच्या हातात अनेक नवीन प्रोजेक्टस आहेत. नुकताच विकीच्या आगामी ‘सरदार उधम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या दरम्यान विकीचा याच सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अलीकडेच विकीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ‘सरदार उधम’ सिनेमातील असून, यात त्याचा लूक खूपच वेगळा दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “१९३३ मध्ये ईस्टर्न यूरोपमधल्या जंगलात कुठेतरी.” त्याचा हा फोटो पाहिला तर विकी बर्फाळ प्रदेशात दिसत असून, त्याने फारच ब्राऊन रंगाचे स्वेटर घातलेले आहे. त्याच्या मागे एक ब्रिटिश नागरिक देखील उभा असलेला दिसत आहे. या फोटो मध्ये विकीची नजर खूप खूप काही बोलून जाते असून एखाद्या बंडखोराप्रमाणे तेज, आणि करारी नजर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

त्याने पोस्ट केलेला हा फोटो त्याच्या फॅन्ससोबतच कलाकारांना देखील खूपच आवड्ताना दिसत आहे. अनेक कलाकार त्याच्या या फोटोवर कमेंट्स देखील करत आहे. या फोटोवर रणवीर सिंगने ‘हार्ड ,हार्ड ,हार्ड’ भूमी पेडणेकरने ‘वाह’ मनीष मल्होत्राने ‘ओह वॉव’ आदी अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. त्याचवेळीस असंख्य सोशल मीडिया यूजरने या फोटोवर फायरचे ईमोजी कमेंट केले आहेत.
चित्रपटांबरोबरच विकी कौशल त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत त्याचे नाव जोडले जात आहे. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्याचवेळी, काही काळापूर्वी त्यादोघांची बातमी समोर आली होती.पण त्याने गुपचूप ती बंद केली आहे.

सध्या विकी त्याच्या चित्रपटांइतकाच कॅटरिना कैफसोबत असलेल्या अफेयरच्या चर्चांमुळे देखील खूप गाजत आहे. त्या दोघांचे सोबत अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून या चर्चा सुरू झाल्या. मात्र या दोघांकडून किंवा त्यांच्या टीमकडून अजूनपर्यंत या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ‘सरदार उधम’ व्यतिरिक्त तो, मोनेक शॉ, मिस्टर लेले या चित्रपटातही दिसणार आहे. ‘मिस्टर लेले’ सिनेमात विकी सारा अली खानसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दहावी पास होताच मिळाले चित्रपटात काम करण्याचे बक्षीस, ‘या’ कारणामुळे नाव बदलून फिरत होती श्रृती मराठे

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा