Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड Vicky Kaushalच्या फोन वॉलपेपरवर दिसणारी ‘ती’ क्यूट मुलगी आहे तरी कोण?

Vicky Kaushalच्या फोन वॉलपेपरवर दिसणारी ‘ती’ क्यूट मुलगी आहे तरी कोण?

अभिनेता विकी कौशल (vicky Kaushal )आणि अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif ) बॉलीवूडमधील आदर्श जोडी मानली जाते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. अनेकदा दोघे जाहीरपणे एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर दोघे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. विकी व कतरिना एकमेकांबरोरचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. दरम्यान, एका मुलाखतीत विकीने त्यांच्या फोनच्या वॉलपेपरसंदर्भात खुलासा केला आहे.

एका मुलाखती दरम्यान विकीने त्याच्या मोबाईलच्या वॉलपेपरसंदर्भात भाष्य केले. यावेळी विकीला तु कोणत्या गोष्टीपासून लांब राहू शकत नाहीस? असे विचारल्यानंतर अभिनेत्याने उत्तर दिले की, त्याचा फोन हा त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. तुमचा दिवस या फोनने संपतो आणि हो, तो नेहमी तुमच्यासोबत असतो.

आम्ही अशा काळात जगत आहोत जिथे तुम्ही फोनशिवाय आयुष्याचा विचारही करू शकत नाही.” यानंतर त्याने आपल्या फोनची स्क्रीन दाखवली. त्यावर एक क्यूट मुलगी दिसली. तर ती क्यूट मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून कतरिना आहे. कतरिनाच्या लहानपणीचा फोटो विकीने मोबाईल वॉलपेपर म्हणून लावला आहे.

दोघांमधील नात्याबद्दल बोलताना विकी म्हणाला, लग्नाच्या अडीच वर्षानंतरही एकमेकांबद्दलची भावना बदलेली नाही. आमच्या डेटींगच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आम्ही जेव्हाही भेटायचो तेव्हा एक उत्साह असायचा आणि आता लग्नाच्या अडीच वर्षानंतरही ती भावना बदललेली नाही. आणि मी अशी व्यक्ती आहे जी कधीही जास्त रोमँटिक झाली नाही. पण ती मला एक रोमँटिक व्यक्ती बनवते.

विकी कौशल व कतरिना कैफने ९ डिसेंबर २०२१ ला लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नातेवाईक व जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

 

author avatar
tdadmin

हे देखील वाचा