Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड ‘नवरदेवाचा चेहरा कसा चमकतोय!’, विक्की कौशलचा फोटो पाहून चाहते करतायेत त्याची मस्करी

‘नवरदेवाचा चेहरा कसा चमकतोय!’, विक्की कौशलचा फोटो पाहून चाहते करतायेत त्याची मस्करी

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल या दिवसात त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. मागील दोन दिवसांपासून बातम्या येत आहेत की, विक्की आणि कॅटरिना लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. तसेच अशा देखील बातम्या आल्या आहेत की, ते दोघे राजस्थानमधील एका शानदार रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहे. परंतु दोघांकडूनही या गोष्टीची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. तरी देखील त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू आहे.

लग्नाच्या या अफवांमध्येच विक्की कौशलने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या भलताच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये विक्की सोफ्यावर बसून कोवळ्या उन्हाचा आनंद घेत हसताना दिसत आहे. युजर्स त्याच्या या फोटोवर सातत्याने कमेंट्स करत आहेत. (Vicky kaushal share photo amid marriage rumour with Katrina fans says he is glowing)

एका युजरने या फोटोवर कमेंट केली आहे की, “लग्नाचा आनंद.” तसेच आणखी एकाने लिहिले आहे की, “लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा”, तर आणखी एकाने कमेंट केली आहे की, “नवरदेवाचा चेहरा चमकत आहे.”

विक्कीने हा फोटो शेअर करून अगदी थोडा वेळ झाला तरी देखील या फोटोला २७ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. विक्की कौशलची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्याच्या फोटोवर त्याचे चाहते नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात. अशातच आता लग्नाची बातमी समोर आल्यापासून सगळेजण त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, कॅटरिना आणि विक्की राजस्थानमधील सवाई माधेपुरमधील एका रिसॉर्टमध्ये सात फेरे घेणार आहेत. परंतु आता त्यांचे चाहते त्यांच्याकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेची वाट बघत आहेत.

यातच कॅटरिनाची आई सुझेन आणि बहीण इसाबेल मुंबईमधील एका एथेनिक स्टोरच्या बाहेर स्पॉट झाली आहे. त्या दोघीही तिथे शॉपिंग करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी कपड्यांची खरेदी केल्याने आता तर सगळ्यांच्या मनात विक्की आणि कॅटरिना यांच्या लग्नाबाबत खात्री पटली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विक्की कौशलने शेअर केला ‘सरदार उधमसिंग’ सिनेमातील हृदयद्रावक फोटो, पाहून तुम्हालाही वाटेल भीती

-‘हजारो ऑडिशनमध्ये झालो रिजेक्ट दुसरा कोणताच पर्याय नव्हता’, म्हणत विक्की कौशलने सांगितले त्याच्या संघर्षाबद्दल

-अफेअरच्या चर्चामध्ये समोर आला व्हिडिओ, एकमेकांना मिठी मारताना दिसले विक्की आणि कॅट

हे देखील वाचा