‘हजारो ऑडिशनमध्ये झालो रिजेक्ट दुसरा कोणताच पर्याय नव्हता’, म्हणत विक्की कौशलने सांगितले त्याच्या संघर्षाबद्दल

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असणारा विक्की कौशल सध्या चांगलाच गाजत आहे. एक तर कॅटरिना कैफसोबत जोडत असलेले नाव आणि दुसरे म्हणजे त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘सरदार उधमसिंग.’ इंडस्ट्रीमधील प्रतिभावान अभिनयच धनी असणाऱ्या विक्कीला आज जे यश, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळत आहे, त्यामागे त्याची अजोड आणि कठीण मेहनत होती. अनेक वर्ष संघर्ष करून त्याने हे स्थान मिळवले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितले.

याबद्दल सांगताना विक्की म्हणतो, “जेव्हा तुम्ही ऑडिशनला जातात तेव्हा तुम्हाला समजते की, तुम्ही किती पाण्यात आहात. कारण तेव्हा तुम्ही शंभर ते हजारांपेक्षा अधिक लोकांसोबत स्पर्धा करत असतात. हजारो कलाकार रांगेत उभे राहून त्यांना संधी मिळण्याची वाट बघत असतात. यात अनेक कलाकार खरंच चांगले प्रभावी असतात. त्यांना पाहून आपला आत्मविश्वास डगमगतो आणि तुमच्यासमोर असलेले आव्हान अधिक वाढते. तुम्हाला हजारो ऑडिशन द्यावा लागतात, जर त्यात तुम्ही चांगले काम केले तर तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढायला सुरुवात होते.”

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

पुढे विक्की म्हणतो, “लोकांना हे माहीतच नसते की, जेव्हा मी १० ऑडिशन पास केले तेव्हा मी १००० ऑडिशन नापास देखील झालो होतो. मी १० ऑडिशन पास करतो तेव्हा लोकांना वाटते की, याला खूपच सहज काम मिळाले, मात्र असे नाही. माझ्याकडे कोणताच दुसरा पर्याय उपलब्ध नाही. जर मी अभिनय केला आणि माझा अभिनय लोकांना नाही आवडला किंवा मला अभिनयात यश मिळाले नाही तर हा विचार आपल्याला आपले काम अधिक मन लाऊन करण्यासाठी हिंमत देतात.”

विक्की बद्दल सांगायचे झाल्यास, त्याला ‘उरी’ सिनेमानंतर तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने त्याच्या जिवंत अभिनयाने त्यांची अभिनयातील पकड सिद्ध केली. लवकरच तो ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या सिनेमात दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

Latest Post