Thursday, September 5, 2024
Home बॉलीवूड ऑनलाइन लीक झाला विकी-तृप्तीचा ‘बॅड न्यूज’, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार परिणाम

ऑनलाइन लीक झाला विकी-तृप्तीचा ‘बॅड न्यूज’, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार परिणाम

विक्की कौशल,तृप्ति डिमरी आणि एमी विर्क यांचा सिनेमा ‘बॅड न्यूज’ हा १९ जूलैला प्रदर्शित झालेला आहे.पण त्याआधीच सिनेमातील कलाकरांना दिग्दर्शक आणि सिनेमाचे निर्माते यांना मोठा धक्का बसलेला आहे. या सिनेमाचे तिन्ही कलाकारांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रमोशन केलं आहे. सिनेमाच्या गाण्यापासून ते ट्रेलरपर्यंत सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

बॅड न्यूज ‘हा’ सिनेमा आज १९ जूलैला शुक्रवारी रिलीज झाला आहे. याचे दिग्दर्शन आनंत तिवारी यांनी केलं आहे. हा एक रोमॅंटींक कॅामेडी चित्रपट आहे. पण चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच या चित्रपटातील एक क्लिप वायरल होत आहे. ज्यात अनन्या पांडे कैमियो रोलमध्ये दिसत आहे. सोशल मिडीयावर फिल्म बघितलेल्या असलेल्या एका व्यक्तीने हा सिन सोशल मिडीयावर वायरल केला आहे. आणि त्या व्यक्तिने सांगितलं अनन्या या सिनेमात कैमियो करणार आहे. जे गुप्त ठेवण्यात आलं होतं. या सीनमध्ये तृप्ती अनन्याला आपल्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी धन्यवाद देताना दिसते आहे.

फिल्म मधील ‘तौबा तौबा’ या गाण्याने सगळ्या प्रेक्षकांच लक्ष सिनेमाकडे आकर्षित केलं आहे. या गाण्याला ‘करण औजला’नाावाच्या संगीतकाराने गायलं आहे आणि संगीत सुद्धा दिलं आहे. फिल्मच दूसरं गाणं ‘जानम’ विक्की आणि तृप्ति याच्यात या गाण्यातील शानदार केमिस्ट्रीमूळे चर्चेत आहे.

फिल्मचा विषय वेगळा असल्याकारणाने बॉक्स ऑफिसवर काय त्याचा परिणाम होतो हे बघण विशेष ठरेल.या चित्रपटात आपल्याला विक्की कौशल,तृप्ति डिमरीआणि एमी विर्क यांची मजेशीर केमिस्ट्रीमूळे बघायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी नव्या सीझनमध्ये रितेशचा कल्ला सुरू होणार
अनंत आणि राधिका अडकले लग्न बंधनात; लग्नातील पहिला फोटो आला समोर

 

हे देखील वाचा