मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि दर्जेदार अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधने नेहमीच त्याच्या जीवनात अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. टेलिव्हिजन, चित्रपट, नाटकं या तिन्ही क्षेत्रात त्याने अतिशय उत्तम काम केले आहे. सुबोध मराठीसोबतच काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील झळकला आहे. सुबोध नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या कामाच्या अपडेट त्याच्या सोशल अकाऊंटवरून देत असतो.
सुबोधने नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र वायरल होत असून त्याबद्दल सर्वांच्याच मनात काही प्रश्न निर्माण होत आहे. सुबोधने त्याचा घोडेस्वारी करतानाच एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने ‘तयारी’ असे शीर्षक दिले आहे. आता हे शीर्षक वाचल्यावर साहजिकच प्रेक्षकांच्या मनात प्रश्न येत आहे. नक्की तयारी कशाची? सुबोधचा कुठला ऐतिहासिक सिनेमा येतोय की ऐतिहासिक मालिका? असे अनेक प्रश्न सुबोधला विचारले जात आहेत. मात्र सुबोध नक्की कसली तयारी करतोय हे तर वेळ आली की समजेलच.
सुबोधने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक दिग्दर्शक देखील आहे. त्याने ‘कान्हाज मॅजिक’ या त्याच्या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेची निर्मिती केली आहे. शिवाय तो ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत मुख्य भूमिका देखील साकारत आहे.