Wednesday, August 6, 2025
Home कॅलेंडर “माझी लेक आहे पडद्यावर चमचमणारी चांदणी”…ऐका मानसी नाईकच्या आईचा झकास उखाणा

“माझी लेक आहे पडद्यावर चमचमणारी चांदणी”…ऐका मानसी नाईकच्या आईचा झकास उखाणा

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक आज विवाह बंधनात अडकणार आहे.  विवाहापूर्वी १८ जानेवारीला मानसीच्या घरी ग्रहमख पूजा केली गेली. या विधीपासूनच लग्नाच्या विधींना सुरुवात होत असते. मानसी तिच्या मित्रांसोबत म्हणजेच बॉक्सर प्रदीप खरेरासोबत आज लग्न करत आहे.

महाराष्ट्रीयन पद्धतीने होणारे हे लग्न पुण्यात संपन्न होत आहे. मानसी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. मानसीने रिलेशनशिप मध्ये असल्यापासून साखरपुडा, लग्नाची तयारी आदी सर्व गोष्टींची माहिती न विसरता ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे. मानसीने तिची आई उखाणा घेत असतानाचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ग्रहमख पूजेच्या दिवशी मानसीच्या आईने उखाणा घेतला होता. हा व्हिडीओ पोस्ट करतांना तिने लिहिले, ‘आकाशाचा केला कागद, समुदाची केली शाई, तरीही आईचा महिमा, लिहीता येणार नाही..आईचा उखाणा. लव्ह यू आई.’

 

या व्हिडीओत मानसीच्या आईने ‘माझी लेक आहे पडद्यावर चमचमणारी चांदणी, लग्नघटीका समीप आली, गाऊ आनंदाची गाणी, गृहमुखाचे दिवशी सांगते राजन माझे राजा आणि मी त्यांचीच राणी.’ हा उखाणा घेतला.
मानसीचा होणारा पती प्रदीप खरेरा हा बॉक्सर तर आहेच, शिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. त्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. शिवाय तो मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स २०१८ चा विजेता देखील आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीने ही खास गोष्ट शेअर केली होती.

हे देखील वाचा