Saturday, June 29, 2024

बुरखा घालून चित्रपट पाहण्यासाठी गेली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखूही शकले नाहीत चाहते

सिनेप्रेमी केवळ सामान्य लोकच नाहीत, तर सिनेसृष्टीत काम करणारे सेलिब्रिटी देखील आहेत. सिनेमाची ही आवड या सेलिब्रिटींना अभिनेते होण्यासाठी प्रेरित करते. त्यामुळे त्यांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात आणले जाते. सेलिब्रेटी असल्याने अभिनेत्यांना चित्रपटगृहात जाऊन सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणे चित्रपट बघता येत नाही, पण त्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग शोधले आहेत. सर्वसामान्य व्यक्ती जसा चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात, बरेचवेळा तसा आनंद सिलेब्रिटींना घेणे शक्य नसते. कारण त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असल्याने चाहते लगेच त्यांच्या मागे गर्दी करून उभा असतात. याचमुळे आता एका अभिनेत्रीने यावर उपाय शोधला आहे. चला तर मग जाणून घेऊया.

साई पल्लवीने चित्रपटगृहात पाहिला तिचा चित्रपट
साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) तिचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेली होती. सिलेब्रिटी असल्यामुळे ती उघडपणे चित्रपटगृहात जाऊ शकत नव्हती, म्हणून तिने बुरख्यात लपून तिचा चित्रपट पाहिला. साई पल्लवीच्या ‘श्याम सिंघा रॉय’ या नवीन चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक होत आहे. अशा स्थितीत तिला तिचा चित्रपट सिनेमागृहात पाहायचा होता.

पल्लवीसोबत होता दिग्दर्शक
पल्लवीने बुरखा घालून चित्रपट पाहायला जाण्याचा निर्णय घेतला. तिने चित्रपटगृहात आपल्या चाहत्यांमध्ये बसून हा चित्रपट पाहिला आणि त्याचा आनंदही घेतला. इतकेच नाही, तर साई पल्लवीला कोणी ओळखूही शकले नाही आणि तिचा ‘श्याम सिंघा रॉय’ चित्रपट पाहून ती कोणत्याही अडचणीशिवाय परतली. आता साई पल्लवीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये साई पल्लवी आणि दिग्दर्शक राहुल सांकृत्यन त्यांचा चित्रपट एकत्र बघताना दिसत आहेत. चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्यानंतर साई पल्लवीने कॅमेऱ्यासाठी पोझ दिली. ‘श्याम सिंघा रॉय’ या चित्रपटात अभिनेता नानीने दुहेरी भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटात साई पल्लवी रोझी नावाच्या मुलीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला असून, त्याचे कौतुक होत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा