Tuesday, July 9, 2024

पत्नी सुगंधा मिश्राविषयी बोलताना संकेत भोसलेला अश्रू अनावर; बोलता बोलताच लागला रडू, पाहा भावुक व्हिडिओ

लोकप्रिय कॉमेडियन आणि डॉक्टर संकेत भोसलेने अलीकडेच ‘द कपिल शर्मा शो’ फेम सुगंधा मिश्रासोबत लग्नगाठ बांधली आहे. हे दोघे बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि त्यांचे लग्नही कोरोनामुळे २- ३ वेळा पुढे ढकलले गेले होते. पण अखेर संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा जालंधरमध्ये २६ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले.

लग्नानंतरपासूनच सुगंधा आणि संकेतने सोशल मीडियावर बरेच फोटो पोस्ट करायला सुरुवात केली. यात त्यांनी मेहंदी आणि हळदीपासून ते साखरपुडा आणि लग्नापर्यंत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे जोरदार व्हायरल होत आहेत. अलीकडेच सुगंधा मिश्राने त्यांच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संकेत भोसले चक्क रडताना दिसत आहे.

खरं तर, व्हिडिओमध्ये संकेत भोसले, पत्नी सुगंधा मिश्राबद्दल हृदयस्पर्शी भाषण देत असतो आणि बोलता बोलता त्याचा कंठ दाटून येतो. त्याला अश्रू अनावर झाल्याने तो रडू लागतो. मात्र, सुगंधा लगेच त्याचे अश्रू पुसते आणि त्याला शांत करते.

व्हिडिओमध्ये संकेत भोसले म्हणत आहे, “सुगंधासाठी, मी अगदी सुरुवातीपासूनच एक गोष्ट म्हणतो, की तू खूप खतरनाक आहेस. माझ्या मते, सर्व मुलींनी खतरनाक असायला हवे. परंतु कोणतीही मुलगी सुगंधा इतकी खतरनाक असू शकत नाही की, कोणीही तिच्या प्रेमातच पडेल. मला खूप आनंद होत आहे. मला समजतच नव्हते की मी…” एवढे बोलून संकेत रडू लागला.

त्यानंतर सुगंधा मिश्राने प्रेमाने संकेतचे अश्रू पुसून, त्याला मिठी मारली. हा व्हिडिओ सुगंधाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे आणि त्यासोबत एक गोंडस कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडिओ पाहून संकेत भोसले आश्चर्यचकित झाला आणि त्याने कमेंट केली की, “हा वाला व्हिडिओ पोस्ट नव्हता करायचा.”

कोरोना महामारीमुळे सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांच्या लग्नात केवळ २०-२६ लोकच उपस्थित होते आणि त्या सर्वांची कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले, तर सुगंधाने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, ती आणि संकेत चांगले मित्र आहेत. त्यांच्या मनात भावना तेव्हा निर्माण झाल्या, जेव्हा त्यांच्या डेटिंगची बातमी येऊ लागली. डेटिंगच्या बातमीनंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या मागे लागले आणि म्हणाले की, लवकरच दोघांनीही लग्न करावे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंटनॅशनल मीडियावर भडकली कंगना रणौत, व्हिडिओ शेअर करून संताप केला व्यक्त

-‘तुम्ही हे खूप चुकीचं करत आहात’, म्हणत रणबीर कपूरने पॅपराजींना चांगलेच सुनावले

-प्रेम हे! विराट कोहलीने गायले होते पत्नी अनुष्का शर्मासाठी ‘हे’ गाणे, अभिनेत्रीचे डोळे आले होते भरून

हे देखील वाचा