आता करोडोंची कमाई करणाऱ्या विद्या बालनला पहिल्या जाहिरातीसाठी मिळाले होते केवळ ‘इतके’ रुपये


बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही सध्या तिच्या ‘शेरनी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 18 जूनला ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनने तिच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन करण्यात सध्या विद्या बालन व्यस्त आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या करीअरच्या सुरुवातीच्या दिवसाची आठवण काढून कधी न समोर आलेल्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

झूमला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिच्या करिअरची सुरुवात कोणत्या मालिकेमधून, चित्रपटामधून नाही तर एका सरकारी ऍड कॅम्पेनमधून झाली होती. त्यासाठी तिला 500 रुपये मिळत होते. तिने सांगितले की, या ऍडमध्ये ते चार जण होते. यामध्ये तिची बहिण आणि एक मैत्रीण देखील होती. या ऍडसाठी तिला एका झाडाखाली उभे राहून स्माईल द्यायची होती. यासाठी प्रत्येकाला 500 – 500 रुपये मिळाले होते. या सोबत तिने संगितले की, तिचा हा पहिला शो कधी प्रदर्शित झाला नाही.

अनेकांना असे वाटते की, विद्या बालनने तिच्या करीअरची सुरुवात 1995 मध्ये एकता कपूरच्या सुपरहिट कॉमेडी शो ‘हम पांच’ मधून केली आहे. पण हे पूर्ण सत्य नाहीये. विद्याने सांगितले की, तिच्या पहिल्या टीव्ही ऑडिशनसाठी ती तिच्या आई आणि बहिणी सोबत गेली होती. या शोचे नाव ‘ला बेला’ हे होते. परंतु हा शो आजपर्यंत टेलिकास्ट झालेला नाही.

विद्या बालनने 2005 साली ‘परिणीता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सोबतच तिने ‘भूल भूलय्या’, ‘नो वन कील्ड जेसिका’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘पा’, ‘कहाणी’, ‘मिशन मंगल’, ‘तुम्हारी सुलू’, ‘शकुंतला देवी’ या सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘शेरनी’ या चित्रपटात तिने एका फॉरेस्ट ऑफिसरचे पात्र निभावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट

-‘शालू’च्या डान्सने पुन्हा चोरली लाखो मने; बघता बघताच पडला लाईक अन् कमेंट्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.