सध्या ओटीटीवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या वेबसीरिजमध्ये नाव घ्यायचं झालं, तर ते नक्कीच ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसीरिजचं घ्यावं लागेल. या वेबसीरिजने आपल्या पहिल्या सिझनमध्ये मिळवलेल्या अफलातून यशानंतर आता दुसरा सिझनही प्रेक्षकांसाठी आणला आहे. यामध्ये मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनीच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली. इतकेच नव्हे, तर वेबसीरिजमधील इतर पात्रांनीही जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. जसे की, चेल्लम सर, जेके, धृती, मिलिंद, साजिद आणि राजी. विशेष म्हणजे या सर्वांमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. यात तिने मनोज यांच्या पत्नीची म्हणजेच सुचीचे पात्र निभावले होते, जी दोन मुलांची आई असते. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली आहे. (Tollywood Actress Priyamani Recalls Working With King Shahrukh Khan In Chennai Express Movie Actress Said He Gave Her 300 Rupees)
शाहरुख खानसोबत चेन्नई एक्सप्रेसमधील गाण्यात दिसली होती प्रियामणि
मनोज वाजपेयी यांच्या पत्नीची सुचीची भूमिका साकारण्यापूर्वी प्रियामणिने शाहरुख खानसोबत ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातही काम केले आहे. प्रियामणि आणि शाहरुख खानने ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये ‘१२३४’ या गाण्यात एकत्र डान्स केला होता. या गाण्यालाही प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती. नुकतेच एका मुलाखतीत या गाण्याच्या आठवणींना उजाळा देत प्रियामणिने शाहरुख खानबाबत खास गोष्टी सांगितल्या आहेत.
शाहरुख खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. जरी त्याचे चित्रपट मागील काही काळापासून पडद्यावर काही कमाल दाखवू शकले नसले, तरीही त्याचा स्टारडम अद्याप कमी झालेला नाही. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात त्याचे चाहते आहेत. अशामध्ये देशातील कलाकारही शाहरुखचे चाहते आहेत. आजपर्यंत जितक्या कलाकारांनी शाहरुखसोबत काम केले आहे, त्यांनी शाहरुखची प्रशंसा केली आहे. त्यातीलच एक आहे प्रियामणि. प्रियामणिने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, शाहरुख खानसोबत या गाण्याच्या शूटिंगदरम्यान काम करण्याचा अनुभव कसा होता. यासोबत तिनेे हेही सांगितले की शाहरुखने या गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिला ३०० रुपये दिले होते. ते आजही तिच्याकडे आहेत.
प्रियामणिने म्हटले की, “आम्ही या गाण्याची शूटिंग करत होतो आणि यासाठी जवळपास ५ दिवसांचा कालावधी लागला होता. माझ्यासाठी हा खूपच चांगला अनुभव होता. शाहरुख खानला चित्रपटांचा बादशाह कोणत्यातरी खास कारणामुळेच म्हणतात. तो आपल्या देशातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. तो इतका यशस्वी आहे, परंतु त्याने कधीच आपल्या अपयशाला आपल्यावर अधिराज्य गाजवू दिले नाही. तो खूपच गोड व्यक्ती आहे. तो शूटिंग सेटवर सामान्य व्यक्तीप्रमाणेच वागतो.”
“तो प्रत्येकाला खूपच आरामदायी वाटावे असे वागतो. मला वाटते की, त्याचे व्यक्तिमत्त्वच असे आहे की, तुम्ही त्याच्यावर प्रेम करू लागता. जेव्हा आम्ही शूटिंग सुरू केली होती, तेव्हा पहिल्या दिवशी मला त्याच्यासोबत काम करताना कोणत्याही प्रकारची समस्या जाणवली नाही. शूटिंग सुरू होण्याच्या एक दिवस आधीच मी सेटवर पोहोचले होते,” असेही पुढे बोलताना ती म्हणाली.
शाहरुखने दिलेले ३०० रुपये ठेवल्यात जपून
यासोबतच ३०० रुपयांचा किस्सा सांगताना तिने म्हटले होते की, “पहिल्या दिवसाची शूटिंग संपल्यानंतर शाहरुखने आमची खूप काळजी घेतली. आम्ही त्याच्या आयपॅडवर कोण होणार करोडपतीदेखील खेळलो होतो. त्यामध्ये त्याने मला ३०० रुपये दिले होते. ते आजही मी सांभाळून ठेवले आहेत. तो खरंच खूप प्रेमळ आहे आणि आपल्या देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे.”
‘द फॅमिली मॅन २’ हा चित्रपट नुकताच ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. यासोबतच आता या वेबसीरिजच्या तिसऱ्या सिझनवरही काम सुरू केल्याचे वृत्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चक्क पाण्यात झोपून दिली तिने पोझ; चाहत्यांना पाहायला मिळाली पूजा सावंतची ‘हॉट अन् हटके’ स्टाईल