विद्या बालन (Vidya Balan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचा ‘पा’ (Paa) हा चित्रपट 2009 मध्ये आला होता. या चित्रपटात विद्याने अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका केली होती आणि खास गोष्ट म्हणजे अमिताभ तिच्यापेक्षा तब्बल 36 वर्षांनी मोठे आहेत! पण ही भूमिका करताना विद्या खूप घाबरली होती.खूप लोकांनी तिला म्हटलं,”असं काही करशील तर करिअरच बुडेल!” काहींनी तर सरळ सांगितलं “हा चित्रपट करू नकोस!” टोमणेही ऐकावे लागले.पण तरीही तिने धाडस केलं आणि आजही हा चित्रपट लोकांच्या लक्षात राहिलाय!
खरं तर विद्याने हिंदी चित्रपटात 20 वर्षं पूर्ण केलीत. त्या निमित्तानं तिने फिल्मफेअरशी गप्पा मारल्या.गप्पांमध्ये तिने ‘पा’ चित्रपटाचं एक मजेशीर किस्सा शेअर केला.ती म्हणाली,”जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटाची कथा ऐकली,तेव्हा माझ्या मनात आलं अरे,ला बाल्की वेडं झालाय का काय! तो मला आणि अभिषेकला अमिताभ बच्चनचे आई-वडील दाखवायला म्हणतोय! हे ऐकायलाच किती विचित्र वाटत होतं!” विद्या म्हणाली,”जेव्हा मी चित्रपटाची पूर्ण स्टोरी ऐकली,तेव्हा माझ्या मनात काहीतरी क्लिक झालं.माझ्यातला जो अभिनयासाठीचा क्रेझ आहे ना,त्याने मला सांगितलं ‘हा चित्रपट तर नक्की करायलाच हवा!’
पण जेव्हा मी चित्रपट साइन केला,तेव्हा अनेक लोकांनी मला थांबायला सांगितलं.कोणी म्हणालं,‘तू वयस्क बाईचं रोल करशील तर तुझं करिअर संपेल!’ पण काही खास लोकांनी मला या चित्रपटासाठी सपोर्ट केलं,आणि मग मी ठरवलं लोक काय बोलतात, याकडे लक्ष न देता चित्रपट करणारच!” ‘पा’ हा चित्रपट एका छोट्या मुलाची कहाणी आहे,ज्याला प्रोजेरिया नावाचा एक दुर्मिळ आजार होता.हे पात्र खुद्द अमिताभ बच्चन यांनी साकारलं होतं. हा चित्रपटा प्रदर्शित झाल्यावर तुफान चालला आणि इतिहासही रचला!
या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,आणि अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.Sacnilk च्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट १८ कोटींना तयार झाला होता,आणि त्याने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल ४६.९१ कोटींची कमाई केली होती!
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
माझ्या बायकोला माझे सिनेमे आवडत नाहीत; अभिनेता इम्रान हाश्मीचा विशेष खुलासा…