विद्या बालन (Vidya Balan) म्हणाली, एकदा इंटीमेट सीनच्या वेळेस एक एक्टर ब्रशही न करता सेटवर आला हाेता!
विद्या बालनला सिनेमात काम करत 20 वर्ष झालीत. तिनं ‘परिणीता’ या चित्रपटातून अभिनयाची सुरूवात केली. यात ती सैफ अली खानसाेबत हाेती, आणि संजय दत्तही एका खास भूमिकेत हाेता. विद्या बालननं आतापर्यंत खूप छान चित्रपट केलेत.’द डर्टी पिक्चर’ मध्ये तिनं धडाकेबाज अभिनय केला आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अलीकडेच तिनं इंटीमेट सीनविषयी एक अनुभव शेअर केला आहे.
विद्या बालननं एका मुलाखतीत एक मजेशीर अनुभव सांगितला. ती म्हणाली,”एकदा इंटीमेट सीन करताना एक एक्टर चायनीज खाऊन आला होता,आणि त्यानं ब्रशही केलेला नव्हता! माझा त्याच्यासोबत सीन होता. मी मनातच विचार केला,’अरे, तुला पार्टनर नाही का?’ पण मी त्याला काहीच बोलले नाही, मिंटही नाही दिला. कारण तेव्हा मी अगदी नवीन होते, खूप घाबरलेली होते”.
याच मुलाखतीत तिनं सांगितलं की, ती एक अभिनेत्री म्हणून कधीच असुरक्षित वाटत नाही. ती म्हणाली,”मी खूप पॉझिटिव्ह आहे. मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. लोकांनी सांगितलं की वजन कमी कर, स्वतःवर काम कर पण मी म्हटलं, माझ्यात काहीच कमी नाही. आणि हाच माझा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड मला पुढे जाण्यास मदत करतो”.
विद्या बालनची सुरुवात टीव्हीपासून झाली होती. ती ‘हम पांच’ या मालिकेत दिसली होती. त्यानंतर तिनं चित्रपटाकडे वळण घेतलं आणि ‘भूल भुलैया’, ‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘जलसा’, ‘इश्किया’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केलं”.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा