Saturday, June 29, 2024

नवरा आहे करोडपती, तरीही विद्या बालन वापरते ‘या’ व्यक्तीने भेट दिलेली कार

बॉलिवूडची मिस परफेक्शनिस्ट असलेली अभिनेत्री विद्या बालन हीचा १ जानेवारीला वाढदिवस आहे. १ तारखेला विद्या ४१ वर्षांची झाली आहे. इतक्या कमी वयात तिने जी उंची गाठली आहे ती फार कमी अभिनेत्रींनाच जमली आहे. विद्याने आतापर्यंत राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार तसेच काही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं आहे. इतकंच काय २०१४ साली तिला चित्रपट क्षेत्रातील तिच्या कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. अशा या विद्याची एक खास बाबदेखील आहे. डर्टी पिक्चर ते पा सारख्या सिनेमांमध्ये विद्याने आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवलं आहे. तिने यूटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केलं आहे. एवढ्या श्रीमंत व्यावसायिकाबरोबर लग्न करूनही विद्या बालन अजूनही वडिलांनी भेटवस्तू दिलेली कारच चालवते. ही आहे तिची मर्सिडीज बेंझ ई क्लास कार. विद्याला ही कार खूपच जास्त आवडते.

विद्या बालनला कार्स खूप आवडतात. तिच्या आवडत्या कारमध्ये मर्सिडीज बेंझ ई क्लास समाविष्ट आहे. ही गाडी तीला तीच्या वडिलांनी भेट म्हणून दिली होती. विद्याला ही कार स्वतः खरेदी करायची होती पण तिच्याकडे वेळ नसल्याने तिच्या वडिलांनी तिला ही कार भेट म्हणून दिली.

पा चित्रपटातील आपल्या मुलीचं अभिनय कौशल्य पाहून विद्याच्या वडिलांनी २००९ मध्ये ही कार विकत घेतली होती आणि तिला भेट म्हणून दिली होती. तेव्हापासून विद्या बहुतेक वेळी या कारमध्ये प्रवास करताना दिसली. चला विद्या बालनच्या या कारची खासियत पाहुयात. तिच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांव्यतिरिक्त वडिलांच्या प्रेमाने विद्यासाठी ही कार आणखीनच खास बनविली आहे.

विद्या बालनची ही कार मर्सिडीज बेंझ ई क्लास प्रीमियम सेडान आहे. यात अ‍ॅटेन्शन असिस्ट, इंटेलिजेंट लाइटिंग सिस्टम आणि ऍडव्हान्स पार्किंग मार्गदर्शनदेखील आहे. विद्याची ही आवडती कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांत येते. त्याचे पेट्रोल व्हेरिएंट E200 CGI BlueEFFICIENCY आणि E 350 मध्ये येतात. या कारमध्ये विद्याला तिचा आवडता गाण्यांचा संग्रह लावून ड्रायव्हिंगचा आनंद सहज घेता येतोय. तसंच उत्कृष्ट साउंड सिस्टम आहे. हे एमपी३ सह देखील सुसंगत आहे.

भारतात, ही कार बीएमडब्ल्यू ५ मालिका आणि ऑडीशी स्पर्धा करते.  आता ही कार बरीच जुनी झाली आहे, परंतु शक्तिशाली इंजिनमुळे ही कार अद्यापही खूप चांगली चालते. विद्या बालनच्या पतीच्या मालकीच्या बर्‍याच कार्स आहेत पण आजही विद्या बालन तिच्या वडिलांनी दिलेल्या या कारमधूनच फिरताना दिसते. या कारला आजही खूप मागणी आहे.

हे देखील वाचा