बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत, ज्या नक्कीच खूप सुंदर आहे, मात्र अभिनयाच्या बाबतीत त्या मागे आहे. अशी सुद्धा काही उदाहरणं आहेत, ज्या सौंदर्याच्या बाबतीत जरी उन्नीस बीस असल्या तरी अभिनयाच्या बाबतीत नक्कीच त्या खूप पुढे आहेत. अशीच एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्याने तिच्या सौंदर्यावर नाही तर तिच्या अभिनयाच्या क्षमतेवर या क्षेत्रात तिचे स्थान निर्माण केले आहे. विद्या नेहमीच तिच्या चित्रपटांसाठी चर्चेत असते. नेहमी ती तिला आव्हानात्मक वाटतील अशा भूमिका असलेले सिनेमे निवडते आणि हिट देखील करुण दाखवते. विद्या अशा मोजक्या अभिनेत्रींनसारखी आहे, ज्या स्वबळावर सिनेमा हिट करून दाखवतात. तिच्या या अभिनयाच्या ताकदीसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे.

विद्या नेहमीच भूमिका खरी वाटावी यासाठी चित्रपटांना आवश्यक ते सर्व करण्यासाठी तयार असते. विद्याने तिच्या ‘बॉबी जासूस’ या सिनेमात एका डिटेक्टीव्हची भूमिका साकारली होती. तिला या सिनेमात तिच्या कामामुळे अनेक वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या लागल्या. याच सिनेमात तिने एका भिकाऱ्याची भूमिका देखील साकारली होती. तिने भिकाऱ्याचा संपूर्ण अवतार केला आणि ती हैदराबाद रेल्वे स्टेशनच्या बाहेर भिकाऱ्यांच्या रांगेत जाऊन बसली. तिला या अवतारात कोणीही ओळखले नाही. रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने तर तिला काही सुट्टे पैसे दिले आणि फटकारत काही कामी करण्याचा सल्ला दिला. यावरूनच लक्षात येते की विद्याच्या वेषभूषेसह तिचा अभिनय देखील जिवंत होता.
सामान्य लोकं काय विद्याला तिच्या या अवतारात कलाकार देखील ओळखू शकले नाही. विद्या याच अवतारात अभिनेता ऋतिक रोशनकडे गेली. तिला पाहताच तो थोडा थबकला, मात्र नंतर त्याने जवळ येत विद्यासोबत शेकहॅण्ड केला. जेव्हा त्याला समजले की हा भिकारी नसून विद्या बालन आहे, त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर विद्याने अरबाज खान आणि सोहेल खानला देखील वेड्यात काढले होते. (vidya balan turns beggar)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तिच्या निरागस चेहऱ्यावर आजही कोट्यवधी चाहते प्रेम करतात; या सुप्रसिद्ध ‘राज’कारणीसोबत जोडलं होतं नाव
मल्याळम, तमिळ चित्रपटातून अभिनेत्रीला काढले गेले बाहेर! ‘या’ बॉलिवूड चित्रपटाने बदलले विद्या बालनचे आयुष्य