Saturday, June 29, 2024

सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’

बॉलिवूडचा ‘आण्णा’ म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी याची लाडकी लेक आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल यांचा सोमवार (दि, 23 जानेवारी) शुभ विवाह पार पडणार आहे. यांच्या लग्न सोहळ्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चार्चा सुरु होता, त्यामुळे चाहत्यांना देखिल यांच्या लग्नानाची उत्सुकता लागली होती. आता लवकरच हे जोडपं विवाह बंधनात अडकणार आहे. अशातच सुनील शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने पत्रकारांशी मराठीमध्ये संवाद साधला आहे.

अभिनयासोबतच उद्येग क्षेत्रामध्ये सक्रिय असणार प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याची लेक आथिया शेट्टी (Athiya Shetty) क्रिकेटर के एल (KL Rahul) राहुल सोबत आज लग्न बंधनात अडकणार आहे. त्यामुळे लेकीच्या लग्नाच्या तयारासाठी बाप सुनीलशेट्टी कोणत्याच प्रकारची कमतरता भासून नये याची पूर्ण काळजी घेत आहे. तसेच येणाऱ्या पाहुणे मंडळी आणि पत्रकारांची देखिल या लग्नासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. अशातच काही पत्रकारांशी संवाद साधत असताना अभिनेता कडक मराठी बोलताना दिसून येत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आथिया आणि राहुलचा विवाह अभिनेत्याच्या खंडाळामधील बंगल्याववर होणार असून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बंगल्यावरील केलेले डेकोरेशन आणि कार्यक्रमांचे सोशल मीडियावर तुफान फोटो व्हायरल होत आहेत. अशातच सुनील शेट्टी बंगल्याच्या तयारी कुठपर्यत आली आहे हे पाहाण्यासाठी खंडाळाच्या बंगल्यावर आला होता, त्यावेळी त्याने मीडियाशी संवाद साधत असताना माराठी भाषेमध्ये उत्तरी दिले.

 

View this post on Instagram

 

आथिया आणि राहुल हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार असून मीडिया, फोटोग्राफर्स त्यांची एक झलक पाहण्यासाठी खंडाळा बंगल्याच्या बाहेर थांबले होते. त्यांना पाहून सुनील शेट्टी स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने लगेच मीडिया फोचोग्राफर्सशी संवाद सांधला.

 

View this post on Instagram

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी म्हणतो की, “आम्ही कोणीच इथे आत्ता नाहीयोत. उद्या आम्ही सर्वजण इथे येणार. तेव्हा मी त्या दोघांनाही तुमच्याकडे नक्की घेऊन येणार. तेव्हा तुम्हाला आम्हाला जे प्रश्न विचारायचा आहेत ते विचारा.” त्यावेळी त्याने पत्रकारांप्रती काळजी व्यक्त करत त्यांची गौर सोय असल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले. अभिनेत्याच्या या दिलदार अंदाजेन सगळ्यांचेच लक्ष वेधलं असून चाहते सुनील शेट्टीचे कौतुक करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उफ़ तेरी अदा! मौनी रॉयच्या फोटोशूटने वढवलं तापमान, पाहाच व्हायरल फोटो
परम सुंदरी! रश्मी देसाईच्या फोटोंचा सोशल मीडियावर कहर, पाहाच फोटो गॅलरी

हे देखील वाचा