Wednesday, July 3, 2024

शाहरुख अन् ‘थालापती’ने ऍटलीचा वाढदिवस बनवला खास; दिग्दर्शक म्हणाला, ‘माझे आधारस्तंभ…’

सुपरस्टार शाहरुख खान याचा आगामी चित्रपट ‘जवान‘ सध्या चर्चेत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, साऊथ सुपरस्टार थालपती विजय देखील या चित्रपटात दिसणार असल्याचा इशारा चित्रपटाचे दिग्दर्शक ऍटलीने स्वत: दिला आहे. ऍटलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत शाहरुख खान आणि थालपती विजय दिसत आहेत.

‘जवान’मध्ये थलपथी विजयची खास भूमिका
ऍटली (Atlee) याने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत लिहिले की, “मी माझ्या वाढदिवशी आणखी काय मागावं. माझ्या आधारस्तंभांसोबत माझा आतापर्यंतचा सर्वोत्तम वाढदिवस. माझे प्रिय शाहरुख खान सर आणि माझा भाऊ विजय थालापती.” आता हा फोटो पाहिल्यानंतर लोक असा अंदाज लावत आहेत की, थालापती विजय या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.

ट्विटरवर हाेत आहे ट्रेंड शाहरुख-थालापती विजय
या फोटोमध्ये विजय आणि शाहरुख खान (Vijay And Shahrukh Khan) एकत्र पोझ देताना दिसत आहेत. त्याचवेळी तिघेही मॅचिंग ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. त्याचबरोबर शाहरुख आणि थालापती विजय ट्विटरवर ट्रेंड हाेत आहे.

हा चित्रपट जून 2023 मध्ये होणार रिलीज
ऍटली याने ‘जवान’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’च्या बॅनरखाली तयार होत आहे. ‘जवान’ चित्रपट 2 जून, 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान आणि विजय व्यतिरिक्त या चित्रपटात नयनतारा आणि सान्या मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहेत.

शाहरुखचे आगामी चित्रपट
शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने शेवटचे 2018 मध्ये ‘झिरो’ चित्रपटात काम केले होते. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. शाहरुखचा पुढच्या वर्षी ‘जवान’ व्यतिरिक्त सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ आणि राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटातही दिसणार आहे. ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवरीला चित्रपटगृहात प्रदर्शित हाेणार आहे, तर ‘डंकी’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अपूर्णच राहिली राजूंची ‘ही’ इच्छा, दिवाळीला रिलीज होणार कॉमेडियनचा शेवटचा सिनेमा
अमृताच्या साडीतील मनमोहक अदा, एका क्लिकवर पाहा फोटो गॅलेरी
‘माझी मुलगी असतीस तरी मी तुझ्यासोबत…’, टेलिव्हिजन अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

हे देखील वाचा