Saturday, April 20, 2024

अपूर्णच राहिली राजूंची ‘ही’ इच्छा, दिवाळीला रिलीज होणार कॉमेडियनचा शेवटचा सिनेमा

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे आता आपल्यामध्ये नाही राहिले त्यांनी बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) 10:20 मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला. राजू यांनी 41 दिवस मरणाला झुंज दिली आणि शेवटी या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर पूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. राजू यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या कुटुंबासोबत अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचा मित्रपरिवारही उपस्थित होता. राजू श्रीवास्तव हे खूप चांगले कॉमेडियन अभिनेता होते. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या करिअरमध्ये अनिल कपूर ते सलमान खान सारख्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम केले होते. ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कुणाल खेमू यांच्यासोबत पाहायला मिळणार आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, दिवंगत अभिनेते राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचा शेवटचा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शेवटच्या चित्रपटात ते अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) याच्यासोबत दिसणार आहेत. ‘कंजूस मक्खीचूस’ (Kanjus MakhiChus) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजू यांना त्यांच्या एका जवळच्या मित्राला भेटायचे होते. मात्र, दुर्दैवाने हे होऊ शकले नाही आणि त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली.

ठरला होता असा बेत
राजू श्रीवास्तव यांनी आपल्या जवळच्या मित्राला भेटण्याचा बेत केला होता. त्यावेळी त्यांचा मित्र मकबूल निसार याने हा किस्सा सांगितला. त्यांच्या मित्राने खंत व्यक्त करत सांगितले की, “राजूभाऊ रघुवीर यादवसोबत एका प्रोजेक्टवर काम करते होते. आम्ही चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी 16 ऑगस्टला रघुवीर यांना भेटण्यासाठी जाणार होतो, पण नियतीला हे मान्य नव्हते. चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीच राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. आमच्या वेळापत्रकानुसार आम्ही दिल्लीमध्ये आणि देहराडूनमध्ये शूटिंग करणार होतो, पण असे होऊ शकले नाही.” मात्र, राजू श्रीवास्तव यांचे चाहते त्यांचा शेवटचा चित्रपट ‘कंजूस मक्खीचूस’ या चित्रपटामध्ये त्यांना पाहू शकतात. या चित्रपटामध्ये अभिनेता कुणाल खेमूसोबत आणखी मोठ मोठे कलाकार पहायला मिळणार आहेत.

कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार चित्रपट
राजू श्रीवास्तव यांचा शेवटचा चित्रपट ‘कंजूस मक्खीचूस’ हा आई-वडील आणि मुलांवर आधारित आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, चित्रपटाचे निर्माता अनुज शर्मा यांनी सांगितले की, “राजू श्रीवास्तव या चित्रपटामध्ये ‘सरकारी बाबू’ याची भूमिका बजावणार आहेत. राजूच्या या चित्रपटाचे प्रदर्शन दिवाळीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर होणार आहे.”

‘या’ चित्रपटातून केली होती आपल्या करिअरची सुरुवात
राजू श्रीवास्तव यांनी आपल्या करिअरची सुरुवात 80च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘तेजाब’ या चित्रपटामधून केली होती. यानंतर त्यांनी ‘मैंने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘मिस्टर आजाद’, ‘वाह तेरा क्या कहना’, ‘मैं प्रेम की दिवानी हूं’, ‘बिग ब्रदर’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. त्यांच्या अनेक भूमिकांपैकी ‘गजोधर भैया’ ही भूमिका खूपच गाजली होती. राजू यांनी अनेक टेलिव्हिजनवरील अनेक शोमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीनेच लावला शारीरिक अत्या’चाराचा आरोप, फसवणूक अन् ब्लॅकमेल केल्याचाही खुलासा
परिस्थिती काय, बोलतोय काय! राजूंच्या अंत्यसंस्कारात चाहता कॉमेडियनसोबत सेल्फीसाठी उतावळा, व्हिडिओ व्हायरल
राजूंच्या निधनामुळे अमिताभ बच्चनही गेले खचून; म्हणाले, ‘माझा आवाज ऐकून त्याने डोळे उघडलेले, पण…’

हे देखील वाचा