हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांंनी आपल्या असामान्य कर्तुत्वाने सगळ्यांना धक्का दिला आहे. यापैकीच एक नाव म्हणजे विजय आनंद. लहानपणापासुनच चित्रपटक्षेत्रात वावरलेल्या आणि बाळकडू घेतलेल्या या अवलियाने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी चित्रपटाची निर्मिती केली होती. म्हणजे ज्या वयात चित्रपटातील बारकावे पाहायचे असतात, शिकायचे असतात त्याच वयात त्यांनी चक्क चित्रपटाची निर्मिती केली होती. काय आहे ही स्टोरी चला जाणून घेऊ.
चित्रपट दिग्दर्शक , निर्माते, संवाद लेखक आणि अभिनेते अशा सगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या विजय आनंद यांना गोेल्डी आनंद म्हणूनही ओळखल जात. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९३४ मध्ये गुरदासपूरमध्ये झाला. ‘गाइड’, ‘तिसरी मंजील’, ‘ज्वेल थीफ’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या विजय आनंद यांचे मोठे भाऊ चेतन आनंद दिग्दर्शक होते तर देव आनंद अभिनेते होते. या तिघांनी नवकेतन फिल्मची निर्मिती केली होती. याच बॅनरखाली विजय आनंद यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. एका मोठ्या श्रीमंत घरात जन्मलेल्या विजय यांना आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र भयंकर त्रास सहन करावा लागला होता.
तत्पूर्वी इंग्लिश विषयाचे विद्यार्थी असलेल्या विज यांनी अवघ्या २३ व्या वर्षी चित्रपटाची निर्मिती करत सगळ्यांना धक्का दिला होता. १९५७ मध्ये त्यांनी ‘नौ दो ग्यारह’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. इतकेच नव्हेतर त्यांनी या चित्रपटाच शूटिंग फक्त ४० दिवसात पूर्ण केलं होतं. या चित्रपटात भाऊ देवानंद आणि कल्पना कार्तिकने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याबद्दल त्यांनी स्वतः एका मुलाखतीत माहिती दिली होती.
विजय आनंद यांच संपूर्ण बालपण सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या सहवासात गेलं होतं. त्यांना डान्स करण्याचा मोठा छंद होता. एका मुलाखतीत बोलताना विजय आनंद यांनी सांगितले की, जोहरा सहगल, कामेश्वर सहगल, मोहन सेहगलसारख्या अनेक दिग्गजांसोबत त्यांनी बालपण घालवल होत. माझा भाऊ चेतनने त्यांना इथे आणल्यानंतर ते आमच्याकडेच राहिले होते अस ही ते यावेळी म्हणाले होते. विजय आनंद यांनी ज्याप्रमाणे कमी वयात चित्रपट बनवून चर्चेत आले होते. त्याचप्रमाणे त्यांनी भाचीसोबत लग्न केल्यानेही जोरदार चर्चा रंगली होती.
हेही वाचा :
- Uffff! कॅमेऱ्यासमोरच उघडली ‘तिने’ शर्टची बटणं, पाहून चाहत्यांच्या हृदयात वाजली घंटा
- एकेकाळी राहुल द्रविडच्या प्रेमात ठार वेडी झाली होती रवीना टंडन? अभिनेत्रीने ‘त्या’ नात्याबाबत सोडले मौन
- बिघडलेल्या परिस्थितीमुळे ‘सत्ते पे सत्ता’ अमिताभ-रेखा यांची बनू शकली नाही जोडी, बिग बींनी सुचवले हेमा मालिनी यांचे नाव