Wednesday, June 26, 2024

विजय आणि रश्मिका यूएईमध्ये घालवतायेत क्वालिटी टाइम, इंस्टाग्रामवर दिली हिंट

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana)यांच्या अफेअरच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. हे दोघेही सध्या यूएईमध्ये सुट्टी घालवत असल्याचे बोलले जात आहे.विजय आणि रश्मिकाचे चाहते त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दोन्ही स्टार्सचा ठावठिकाणा तपासत आहेत.

त्यांच्या चौकशीतून दोघांच्या काही चाहत्यांनी रश्मिका आणि विजय केवळ यूएईमध्येच असल्याची माहिती अली आहे. 5 एप्रिल रोजीरश्मिकाचा वाढदिवस असल्यामुळे ही गोष्ट विशेष मानली जात आहे. या महत्त्वाच्या दिवशी काही आनंदाचे क्षण घालवण्यासाठी विजय आणि रश्मिका दोघेही तिथे पोहोचल्याचे बोलले जात आहे.

3 एप्रिल रोजी विजयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘द फॅमिली स्टार’ चित्रपटाविषयी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याचा हा आगामी चित्रपट आहे. दुसरीकडे, रश्मिकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मोराचा फोटो शेअर केला होता. विजयच्या पोस्टमध्येही एक मोर दिसत असल्याचे दोघांच्या चाहत्यांच्या लक्षात आले. तेव्हापासून विजय आणि रश्मिका एकत्र यूएईला गेल्याची चर्चा सुरू झाली.

विजय देवराकोंडा त्याच्या व्हिडिओमध्ये सांगत होते की, त्यांचा ‘द फॅमिली स्टार’ हा चित्रपट अमेरिकेत 500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी रिलीज असणार आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या दिवशी रश्मिकाचा वाढदिवस आहे. विजय रश्मिकासोबत तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुट्टीवर गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विजय आणि रश्मिका यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ यांचा समावेश आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या अफेअरबाबत कोणतीही पुष्टी केली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, दोघेही फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसे झाले नाही, पण दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचे चाहते सतत सांगत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता रश्मीका मंदानाने केला चित्रपटात प्रवेश, असा आहे तिचा जीवनप्रवास
रणदीप हुड्डाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘कंगनाने विनाकारण आलियाला टार्गेट केलं होतं’

हे देखील वाचा