Wednesday, July 3, 2024

राखी सावंतला उचलून घेतल्यामुळे विकास गुप्ता झाला ट्रोल, युजर म्हणाले, ‘आता हे काय नवीन?’

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अशी जिची ओळख आहे, ती म्हणजे राखी सावंत. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती खूपच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तर ती नेहमीच चर्चेत असते. अनेकवेळा ती रस्त्यावर, कॉफीमध्ये तसेच जिमच्या बाहेर स्पॉट होत असते. तिला पाहता क्षणी तिचे चाहते तसेच पॅप्पराजी तिच्याकडे आकर्षित होत असतात. ती नेहमीच सर्वांना उत्तरं तसेच सेल्फी देत असते. बिग बॉसच्या घरात असताना तिची विकास गुप्तासोबत खूप चांगली मैत्री झाली होती. ते दोघे अनेकवेळा स्पॉट झाले आहेत. यातच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. परंतु यानंतर राखी सावंत जोरदार ट्रोल होत आहे.

नुकतेच व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून राखी सावंत आणि विकास गुप्ताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विकास पॅप्पराजीसमोर राखीला उचलून घेतो. या व्हिडिओमध्ये राखी आणि विकास मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राखीने बॉडी फिटेड लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. पायात लाल रंगाचे शूज घातले आहेत. तसेच विकासने मल्टी कलरचा शर्ट घातला आहे. ते दोघेही या व्हिडिओमध्ये खूप मस्ती करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्या चाहत्यांना त्यांचा हा व्हिडिओ अजिबात आवडला नाहीये. त्यामुळे ते या दोघांना खूप ट्रोल केले आहे.

या व्हिडिओवर विकास आणि राखीचे चाहते खूप कमेंट करत आहेत. त्यांच्या या मस्तीमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहेत. एका युजरने या व्हिडिओवर कंमेंट केली आहे की, “राज कुंद्राची पार्टनर.” तर दुसऱ्या एका युजरने. “हे खूप खराब आहे” असे लिहिले आहे. एकाने तर असे म्हटले आहे की, त्या दोघांनी लग्न केले पाहिजे. बिग बॉसमध्ये असताना त्या दोघांची मैत्री खूप चर्चेत होती. राखी सावंतने बिग बॉसमध्ये असताना विकाससाठी अर्शी खानसोबत बोलणे बंद केले होते. (vikas gupta trolled after picking up rakhi sawant in his arm)

सध्या राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे अनेक मजेशीर व्हिडिओ समोर येत असतात. तिचा प्रत्येक व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडत असतो. काही दिवसांपूर्वी तिने राज कुंद्रा प्रकरणावर तिचे मत व्यक्त केले होते. तिने सांगितले होते की, “राज कुंद्रा निर्दोष आहेत. त्यांच्याबाबत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यँत त्यांना कोणीही दोषी ठरवू शकत नाही.” यासोबतच ती अनेक गोष्टींवर तिचे मत मांडत असते. नुकतेच तिचे ‘ड्रीम में एंट्री’ हे गाणे रिलीझ झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

हे देखील वाचा